घरमुंबईधक्कादायक: पत्नी निघाली पुरुष

धक्कादायक: पत्नी निघाली पुरुष

Subscribe

ऑनलाईनच्या जमान्यात ऑनलाईन विवाह पोर्टलवर दोघांनी आपली माहिती अपलोड केली. पाहताक्षणी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. सात जन्म एकत्र राहण्याच्या आणाभाका झाल्या. सरतेशेवटी दोघांच्या घरच्यांच्या संमतीने त्यांचा विवाह २०१३ मध्ये झाला. तो आणि तीही सुखात होती. त्यांच्या मधुचंद्राला तो जास्तच खुशीत होता, मात्र पहिल्याच रात्री पत्नीने त्याला वैद्यकीय कारण सांगून अंगाला स्पर्श करू दिला नाही. त्यानंतरही ती, त्याला टाळू लागली. त्यामुळे त्यांच्यात भांडणे होऊ लागली. प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहचले आणि एके दिवशी मिळालेल्या माहितीमुळे त्याच्या आणि कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्याची पत्नी स्त्री, नसून चक्क पुरुष होती. काही दिवसांपूर्वी सुखात असलेला तो आणि त्याचे कुटुंब हादरले. ती ‘स्त्री’ आहे की ‘पुरुष’ हे सिद्ध करण्यासाठी अखेर दोन्ही कुटुंब कोर्टाची पायरी चढले आहेत. दोन्ही कुटुंब आपली बाजूच खरी असल्याचा दावा करत आहेत. मुंबईतील पश्चिम उपनगरात राहणारे निवृत्त सनदी अधिकार्‍याच्या मुलाचा विवाह, ऑनलाईन विवाह पोर्टलवरून २०१३ मध्ये हैदराबाद येथे राहणार्‍या एका डॉक्टर तरुणीशी जुळला. मूळची ती औरंगाबादची होती. तिच्या जन्म दाखल्यात मुलाऐवजी तिची नोंद मुलगी अशी आहे.

२०१३ मध्ये मोठ्या थाटामाटात हा विवाह सोहळा पार पडला. मुलगा एका आंतरराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पदावर कामाला होता तर मुलगी ही डॉक्टर आहे. त्यामुळे दोन्हीकडील कुटुंब या विवाहामुळे खुष होते. मात्र त्यांचा आनंद काही काळच टिकला. परंतु पहिल्याच रात्री तिने पतीला आपल्या पासून दूर ठेवले. मला स्पर्श करू नका मला त्वचेची एलर्जी असल्याचे सांगून तिने त्याला लांब केले. त्यानंतर हे जोडपे मधुचंद्र साजरा करण्यासाठी परदेशात गेले. त्या ठिकाणी देखील तिने त्याला स्पर्श करू दिला नाही. दोघेही काही दिवसांत भारतात परतले. त्यानंतर मात्र दोघांमध्ये खटके उडू लागले. त्याही परिस्थितीत मुलाने बंगळूर येथे कामाच्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. मुलाच्या आईवडिलांनी पत्नीला सोबत घेऊन जा म्हणून असे मुलाला सांगितले. कदाचित बंगळूर येथे गेल्यानंतर पत्नीमध्ये काही फरक पडेल म्हणून त्याने तिलासोबत घेऊन जाण्याची तयारी दर्शवली.

- Advertisement -

दोघेही बंगळूरला गेले परंतु त्याही ठिकाणी तिने स्वतःची स्वतंत्र खोली केली. पत्नी जवळ येऊ देत नाही,स्पर्शही करू देत नसल्यामुळे त्याचा स्वभाव चडचिडा झाला होता. तेथेही दोघाचे भांडण होऊ लागली. अखेर तिने हैद्राबाद येथे वडिलांना फोन करून मला पतीसोबत रहायचे नाही म्हणून सांगितले. तिच्या बोलण्यावरून मुलीच्या वडिलांनी मुलाच्या वडिलांना फोन करून सांगितले. मुलाच्या वडिलांनी थोडं सबुरीने घ्या, नवीन लग्न आहे, आपण त्याचात नको बोलायला म्हणून मुलीच्या वडिलांना समजावले. मात्र ते समजून घेण्याचा परिस्थितीत नव्हते.

अखेर ते दोघे वेगळे झाले आणि मुलीच्या वडिलांनी हैदराबाद न्यायालयात काडीमोड करण्यासाठी खटला दाखल केला. या सर्व वादातून मुलाला आपली नोकरीदेखील गमवावी लागली. आपल्या मुलाची कुठलीही चूक नसताना आपण माघार घ्यायची नाही, असे मुलाच्या वडिलांनी ठरवले. त्यादरम्यान, आपण ज्या मुलीसोबत लग्न केले ती स्त्री नसून पुरुष असल्याचे कळताच त्याला धक्का बसला. त्याने स्वतःला सावरत हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. वडिलांनी सत्य पडताळण्यासाठी मुलीचा ज्या ठिकाणी जन्म झाला त्या ठिकाणी औरंगाबाद येथे जाऊन महानगरपालिकेतून तिच्या जन्माचा दाखला काढला. त्यात ती स्त्री असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र रुग्णालयाच्या रजिस्टरमध्ये पुरुष असल्याचे त्यांना कळले.

- Advertisement -

मुलाच्या वडिलांनी अखेर औरंगाबाद महानगर पालिकेत पत्रव्यवहार करून माहिती मागवली. तेव्हा जन्म दाखल्यात चुकून ‘पुरुष ’चे ‘स्त्री ’झाल्याचे महापालिकेने मान्य केले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी, चौकशी समिती नेमली असल्याचे मुलाच्या वडिलांनी ‘दै. आपलं महानगर’ शी बोलताना सांगितले. आमची घोर फसवणूक झाल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे. माझ्या मुलाच्या आयुष्याशी खेळण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मुलीच्या कुटुंबियांनी फसवणूक करून घटस्फोटाचा खटला न चालवण्यासाठी खंडणी मगितल्याचा आरोप करून मुलाच्या वडिलांनी अंधेरी कोर्टात खटला दाखल केला आहे.

’त्या’चे वडील
माझी सून स्त्री नसून पुरुष असल्याचे जेव्हा कळले तेव्हा आम्हाला धक्काच बसला. आमचा मुलगा तर अजूनही त्या धक्क्यातून सावरलेला नाही. आमची फसवणूक झाली आहे.

’ती’ चे वडील
आमची मुलगी स्त्रीच असून चुकून पुरुष झाले असल्याचा दावा मुलीच्या वडिलांनी केला आहे, मुलाचा स्वभाव तिला न पटल्यामुळे त्यांच्यात भांडणं होत होती, तिला पतीसोबत राहायचे नसल्यामुळे आम्ही घटस्फोटासाठी हैदराबाद कोर्टात खटला दाखल केला आहे.

(प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे दोन्ही कुटुंबांची ओळख गुप्त ठेवण्यात आलेली आहे.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -