घरमुंबईसंपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही, आदित्य ठाकरे यांचा मनसेला टोला

संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही, आदित्य ठाकरे यांचा मनसेला टोला

Subscribe

रामनवमीचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी दादर येथील शिवसेना भवनासमोर भोंगे लावून त्यावर हनुमान चालिसा वाजवत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यावर राज्याचे पर्यावरणमंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना विचारले असता मी संपलेल्या पक्षाला उत्तर देत नाही, अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील वरळीमध्ये विंटेज कार रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांना मनसैनिकांच्या कृत्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मी संपलेल्या पक्षाला उत्तर देत नाही. शिवाय स्टंटबाजीलाही मी भाव देत नाही. आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे की भगवान श्रीराम आपल्या हृदयात आहेत. आपण जे काही करतोय, ते त्यांच्यामुळेच करत आहोत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी आपले हिंदुत्व सोडून दिले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची हयात ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोध करण्यात गेली, त्या पक्षांसोबत मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना सत्तेत जाऊन बसली. त्यांनादेखील या रथाच्या माध्यमातून मी संदेश देऊ इच्छितो की तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व सोडून लाचारी स्वीकारली आहे. ती बंद करा आणि देशधर्मासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन राष्ट्राचे निर्माण करूया, अशा शब्दांत मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी शिवसेनेला आवाहन केले. यानंतर किल्लेदार यांना पोलिसांनी ताब्यातदेखील घेतले. त्यानंतर मुंबईत ठिकठिकाणी मनसेकडून अशाच प्रकारे भोंग्यांवर हनुमान चालिसा वाजवण्यात आली.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -