घरमुंबईमहाराष्ट्रात आम्ही डिसिजन मेकर नाही

महाराष्ट्रात आम्ही डिसिजन मेकर नाही

Subscribe

काँग्रेस नेते राहुल गांधींच्या वक्तव्याने राज्यात खळबळ

आमचा महाराष्ट्र सरकारला केवळ पाठिंबा आहे. मात्र आम्ही तेथील ‘डिसिजन मेकर’ नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. करोना संसर्ग आणि देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.

पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने महाराष्ट्रातील सद्य स्थितीचा उल्लेख करत राहुल गांधी यांना प्रश्न केला होता, की देशातील एक तृतियांश करोनाबाधित महाराष्ट्रात आहेत. तेथील सरकारमध्ये तुम्ही सहभागी आहात. मुंबईत महाराष्ट्राच्या अर्ध्याहून अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रानेही राज्यात लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे वाटते का? कारण तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisement -

पत्रकाराने विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, देशातील दिल्ली, मुंबई आणि पुणे यांसारख्या मोस्ट कनेक्टेड शहरांमध्येच करोना वाढत आहे, असे आपल्याला दिसून येईल. मी आपल्याला एक फरक सांगू इच्छितो, की आमचा महाराष्ट्र सरकारला केवळ पाठिंबा आहे. मात्र, आम्ही तेथील डिसिजन मेकर नाही. आम्ही पंजाब, छत्तीसगड, राजस्थान आणि पदुच्चेरी येथे डिसिजन मेकर आहोत. हा सरकार चालवण्यामधला आणि सरकारला पाठिंबा असण्यामधील फरक आहे. तथापी, महाराष्ट्र त्याच्या कनेक्टिव्हिटीमुळे संघर्ष करत आहे. मुंबई देशातील एक आर्थिकदृष्ठ्या महत्त्वाचे शहर आहे. त्यामुळे केंद्र सरकारने मुंबईला पूर्ण ताकदीनिशी सहकार्य करायला हवे. मला जाणीव आहे, की महाराष्ट्र एक अत्यंत कठीण लढाई लढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील जनतेला पूर्ण ताकदीनिशी सहकार्य करणे आवश्यक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -