घरमुंबईमलेरिया आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव होतोय कमी, मुंबई मनपाचा दावा

मलेरिया आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव होतोय कमी, मुंबई मनपाचा दावा

Subscribe

मुंबई महापालिकेच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आणि विविध विभागांच्या समन्वयामुळे मुंबईत मलेरिया आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात रुग्णसंख्येत बऱ्यापैकी घट झाली आहे, असा दावा मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आला आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आणि विविध विभागांच्या समन्वयामुळे मुंबईत मलेरिया आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. सप्टेंबर महिन्यात मलेरियाचे 1 हजार 313 आणि डेंग्यूचे 1 हजार 360 रुग्ण आढळले होते. तर 30 ऑक्‍टोबरपर्यंत मलेरियाचे 944 आणि डेंग्यूचे 979 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात रुग्णसंख्येत बऱ्यापैकी घट झाली आहे, असा दावा मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आला आहे. महापालिकेच्‍या घरोघरी सर्वेक्षण, बांधकाम प्रकल्‍पस्‍थळी नियंत्रण, झोपडपट्टी व झोपडपट्टी नसलेल्या भागात डास नियंत्रण, धूरफवारणी आणि व्‍यापक जनजागृती आदी विविध उपाययोजनांमुळे मलेरिया व डेंग्यूच्या रुग्ण संख्येत घट झाल्याचे पालिकेने म्हटले आहे. (incidence of malaria and dengue is decreasing, claims Mumbai Municipal Corporation)

हेही वाचा – आफ्रिकेत जाणाऱ्यांचे लसीकरण प्रमाणपत्र कायमस्वरुपी करणार

- Advertisement -

मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निर्देशांनुसार आणि उप आयुक्‍त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली मुंबईकर नागरिकांच्‍या आरोग्‍यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्‍यात आल्‍या आहेत. याचाच एक भाग म्हणून ‘एनोफिलीस’ आणि ‘एडिस’ या डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट करण्‍याची मोहीम राबविली जात आहे. घरोघरी सर्वेक्षण करून महापालिकेच्या कीटक नाशक विभागाकडून कार्यवाही केली जात आहे. प्रभागनिहाय कृती आराखडा तयार करून त्यानुसार कार्यवाही सुरू आहे.

मलेरिया आणि डेंग्यू या दोन्ही आजारांचा प्रसार डासांमुळे होतो. यापैकी मलेरियाचा प्रसार ‘एनोफिलीस’ डासांमुळे, तर डेंग्यूचा प्रसार ‘एडिस’ डासांमुळे होतो. पावसाळ्यात म्हणजे जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत हिवतापाचे तर ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्यांत डेंग्यूचे रुग्ण वाढतात. तापमान, आर्द्रता तसेच अधूनमधून पडणारा पाऊस यामुळे ‘वेक्टर’ डासांची उत्पत्ती वाढते. त्‍यामुळे मलेरिया आणि डेंग्यूच्‍या रूग्‍णसंख्‍येत वाढ होते. या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिकेने प्रतिबंधात्‍मक उपाययोजना हाती घेतल्‍या. त्‍या अंतर्गत सर्वेक्षण युनिट्सची संख्‍या 22 वरून 880 पर्यंत वाढवली. त्‍यात खासगी रुग्णालये, क्लिनिक आणि प्रयोगशाळांचा समावेश आहे. सप्टेंबर महिन्यात मलेरियाचे 1 हजार 313 आणि डेंग्यूचे 1 हजार 360 रुग्ण आढळले होते. तर ऑक्टोबरमध्ये आजपर्यंत मलेरियाचे 944 आणि 979 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात रुग्णसंख्या घटल्याचे दिसून आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -