घरमुंबईवाशिंद स्थानकाजवळ मालगाडीच्या इंजिनात बिघाड; 'मरे' विस्कळीत

वाशिंद स्थानकाजवळ मालगाडीच्या इंजिनात बिघाड; ‘मरे’ विस्कळीत

Subscribe

मालगाडीच्या इंजिन बिघडल्याने कल्याण कसारा दरम्यानची वाहतूक विस्कळीत

आसनगाव-वाशिंद स्थानकाजवळ मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे. या मालगाडीच्या इंजिन बिघडल्याने गेल्या अर्ध्यातासून कल्याण कसारा दरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची विस्कळीत झालेली वाहतूक पुर्ववत येण्यास अर्धा-पाऊण तास लागण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

कसाराकडे जाणाऱ्या जाणाऱ्य़ा रेल्वे वाहतूकीवर मोठा परिणाम झाला आहे. या विस्कळीत झालेल्या वाहतूकीमुळे कल्याण कसारा या मार्गाची वाहतूक ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेच्या विस्कळीत झालेल्या रेल्वे वाहतूकीमुळे कसारा दिशेने जाणाऱ्य़ा प्रवाशांना सतत पडणाऱ्या पावसामुळे त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे मध्ये रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने असून कल्याणकडे येणाऱ्या लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने तर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -