घरमुंबईमुंबईत मतदान करताना मोबाईलवर प्रतिबंध; निवडणूक आयोगाचे आदेश

मुंबईत मतदान करताना मोबाईलवर प्रतिबंध; निवडणूक आयोगाचे आदेश

Subscribe

मुंबईच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यासाठी मतदान होत असताना यावेळी मतदान केंद्रांवर मोबाईल फोनचा वापर करू नये शिवाय, मोबाईल घेऊन जाऊच नये, असे आदेश निवडणूक आयोगाने केले आहेत.

सोमवार, २९ एप्रिलला मुंबईच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यासाठी मतदान केलं जाणार आहे. पण, मतदान करताना मतदान केंद्रांवर मोबाईल फोनचा वापर करू नये शिवाय, मोबाईल घेऊन जाऊच नये, असे आदेश निवडणूक आयोगाने केले आहेत. मतदान करताना किंवा केंदात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय, जर कोणी मतदार मोबाईल घेऊन गेलाच तर त्याने मोबाईल आपल्या नातेवाईकांकडे द्यावा, असंही आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आलं आहे.

राज्यातील चौथा आणि शेवटचा टप्पा

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून चौथा टप्पा हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे, निवडणूक आयोगाकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. मुंबईसह उपनगरात होणाऱ्या मतदानात एकूण ७१ लाख ४७ हजार ६६० एवढे मतदार सहभागी होणार आहेत. यासाठी ७ हजार ७४२ एवढे मतदार केंद्र उभारण्यात आली आहेत. मतदानाच्या प्रक्रियेत ६० हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस, राज्य राखीव पोलिस दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल यांचे जवान देखील तैनात करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली आहे.

- Advertisement -

२९ एप्रिल या दिवशी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदाराला मतदान केंद्राच्या आत मोबाईल फोन घेऊन जाण्यास परवानगी नाही.‌ त्यामुळे किमान ६ ते ७ मिनिटे आपला फोन आपल्यासोबत ठेऊ नये.
– सचिन कुर्वे, जिल्हा निवडणूक अधिकारी

निर्देशित ओळखपत्र नसल्यास हे करा 

वैध मतदार ओळखपत्र नसल्यास ११ ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र नेणे गरजेचे आहे. आधारकार्ड, पॅनकार्ड यापैकी कोणतेही निर्देशित ओळखपत्र नेणं गरजेचं आहे. सोबतच १९५० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -