घरमुंबईपर्यायाशिवाय लोअर परळ पूल बंद !

पर्यायाशिवाय लोअर परळ पूल बंद !

Subscribe

 लोअर परळ डीझी ब्रीज अचानक बंद करण्यात आल्याने तसेच याची प्रवाशांना कल्पना नसल्याने परिसरात प्रचंड गर्दी झाली. पूल बंद केल्याचे नागरिकांना समजल्यावर ईस्टर्न बेकरीकडे उतरणार्‍या जिन्यावर लोकांची गर्दी झाली, ती इतकी झाली की या ठिकाणी चेंगराचेंगरीची होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

लोअर परळ डीझी ब्रीज अचानक बंद करण्यात आल्याने तसेच याची प्रवाशांना कल्पना नसल्याने परिसरात प्रचंड गर्दी झाली. पूल बंद केल्याचे नागरिकांना समजल्यावर ईस्टर्न बेकरीकडे उतरणार्‍या जिन्यावर लोकांची गर्दी झाली, ती इतकी झाली की या ठिकाणी चेंगराचेंगरीची होण्याची शक्यता निर्माण झाली होती. असे होण्याची शक्यता माहित असूनही या ठिकाणी नागरिकांच्या गर्दीचे समायोजन करण्यासाठीची कोणतीही उपाययोजना रेल्वे प्रशासन, महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांनी केली नाही. गर्दीमुळे प्रवाशांचा आरडाओरडा सुरु आहे.

नोकरी-धंद्यासाठी या ठिकाणी प्रवाशांचे लोंढे सकाळी ९ ते १० च्या सुमारास येत असतात. मात्र हा पूल बंद असल्याची अनेक लोअर परळ स्थानकातून बाहेर पडण्यासाठी फक्त एक पूल उपलब्ध आहे, तोही लहान आहे. पूल उतरल्यावर खाली चिंचोळी गल्ली आहे, तिथेच दुचाकी वाहने पार्क करण्यात येतात. त्यामुळे याआधीच्या परिस्थितीतही यातून मार्ग काढत जाताना १० ते १५ मिनिटे लागत होती. मंगळवारी तर २५ ते ३० मिनिटे लागली.

- Advertisement -

वाहनांना पर्याय पण पादचार्‍यांचे काय?

हा पूल बंद केल्यानंतर प्रशासनाने वाहनांसाठी पर्याय निर्माण केले. परंतु पादचार्‍यांना वार्‍यावर सोडून दिले. या पुलाशी जोडलेला महादेव पालव मार्ग म्हणजेच करी रोड रेल्वे स्थानकासमोरील पूल लालबागच्या दिशेने आणि ना.म. जोशी मार्ग हा चिंचपोकळीच्या दिशेने सुरू ठेवण्यात आला. फिनिक्स मॉल आणि कमला मिल कंपाऊंडसमोरील रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. प्रभादेवी रेल्वे स्थानकापासून गणपतराव कदम मार्गे वरळी नाका हा मार्ग सुरू असेल लोअर परळ पुलाखाली असलेल्या भाजी मार्केटमधून पर्यायी मार्ग सुरू करण्यात येणार आहे. लोअर परळ रेल्वे स्थानकात करी रोडहून जाण्यासाठी ना.म. जोशी पुलाखाली डाव्या बाजूला नव्याने सुरू केलेल्या पुलाचा वापर करता येईल.

रुग्ण आणि रुग्णांच्या नातलगांची गैरसोय

या भागात के.ई.एम., टाटा, वाडिया ही मोठी हॉस्पिटल आहेत. या ठिकाणी दररोज हजारो रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक ये-जा करत असतात. सकाळी वेळेत रुग्णालयात पोहोचण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असते. मात्र पादचार्‍यांची गैरसोय झाल्याने रुग्णांची आणि त्यांच्या नातलगांची प्रचंड गैरसोय झाली.

- Advertisement -

लोअर परेलच्या पुलाचे बांधकाम 

लोअर परेलच्या पुलाचें बांधकाम महापालिकेने करावे असे पत्र रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहे. हँकॉक पूल आणि चर्नी रोड स्टेशनच्या रेल्वे पुलाचे काम महापालिकेने केले होते, त्याप्रमाणे लोअर परेल रेल्वे पुलाचे बांधकामही करावे, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. तर पुलाची संपूर्ण जबाबदारी ही रेल्वेचीच असून, बांधकामासाठी आवश्यक ती मदत करण्यास तयार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -