घरमुंबईमहालक्ष्मी एक्सप्रेसमधील ५०० प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले

महालक्ष्मी एक्सप्रेसमधील ५०० प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले

Subscribe

मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील बदलापूर परिसरात झालेला मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी रेल्वे ट्रॅकवर आल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस ही बदलापूर येथे अडकली आहे. गाडी नदीच्या जवळच असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत.

महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या ५०० प्रवाशांना एनडीआरएफच्या जवानांनी बोटीच्या मदतीने किनाऱ्यावर आणले. या प्रवाशांना बदलापूर येथे घेऊन जाण्यात येणार असल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. एनडीआरएफची ४० जणांची टीम घटनास्थळी मदतकार्यासाठी सज्ज असून रेल्वे प्रशासन, सरकार, एअर फोर्स सर्वच यंत्रणा लोकांना रेल्वेतून बाहेर काढण्यासाठी सरसावले आहेत.

- Advertisement -


मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील बदलापूर परिसरात झालेला मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी रेल्वे ट्रॅकवर आल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस ही बदलापूर येथे अडकली. गाडी नदीच्या जवळच असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. पाण्याची पातळी वाढत असून पाणी गाडीत शिरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र त्यामुळे एक्सप्रेसमध्ये अडकलेले जवळपास २००० प्रवासी भीतीच्या सावटाखाली आले आहेत. ठाणे, कल्याण, नवी मुंबई पट्ट्यात शुक्रवार, संध्याकाळपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचे पाणी साचल्याने अनेक रेल्वे स्थानकातील रूळ जलमय झाले आहेत. त्यामुळे रेल्वे तसेच लोकल सेवेला फटका बसला आहे. काल रात्री साडेआठ वाजता मुंबईहून कोल्हापुरकडे रवाना झालेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या काही डब्यांमध्ये बदलापूर-कर्जत मार्गावरील वांगणी रेल्वे स्थानकाजवळ पाणी शिरले आहे. त्यामुळे आज सकाळी सव्वा सात वाजता कोल्हापूरमधील शाहू टर्मिनस येथे पोहचणारी महालक्ष्मी एक्सप्रेस आता उशीराने पोहोचण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

बोटीच्या सहाय्याने प्रवाशांना बाहेर काढले जाईल?

रेल्वे प्रशासनाने तातडीची मदत मागितल्यानंतर एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. मात्र, रस्त्यांवरही पाणी असल्याने मदतीत अडथळे येत आहेत. परंतू बोटीच्या सहाय्याने प्रवाशांना बाहेर काढण्यात येईल, असे सांगितले जात आहे. दरम्यान, कोणत्याही प्रवाशाने गाडीखाली उतरू नये, असे आवाहन एनडीआरएफ टीमकडून करण्यात आले आहे.

पाण्याच्या पातळीत उत्तरोत्तर वाढ होत असून पाणी गाडीत शिरण्याची शक्यता आहे. पाण्याबरोबर साप व अन्य प्राणीही गाडीत शिरण्याच्या शक्यतेने प्रवाशांमध्ये भीती वाढली आहे. अंबरनाथला बी-केबिन परिसरात बदलापूरहून आलेली लोकल रात्री १० वाजल्यापासून पहाटे तीन वाजेपर्यंत रखडली होती. त्यात अडकलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. एनडीआरएफचे पथक येण्यापूर्वीच रेल्वे कर्मचारी आणि आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना बाहेर काढले होते. मात्र, अनेक प्रवाशांनी गाडीतच राहणे पसंत केले, अशी माहिती आरपीएफने दिली आहे.

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये पाणी शिरले

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये पाणी शिरले

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಜುಲೈ 26, 2019

रेल्वे वाहतूकीचे मार्ग बदलले 

वांगणी येथे पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली असून बदलापूर ते कर्जत खोपोली दरम्यानची रेल्वेसेवाही ठप्प झाली आहे. तसेच अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या कल्याण, इगतपुरी, मनमाड, दौड मार्गे वळवण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोल्हापूरहून मुंबईकडे रवाना झालेली रेल्वे काल रात्री पुणे रेल्वे स्थानकातच थांबवण्यात आली होती. मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या मध्य, पश्चिम, हार्बर या तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवांवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची लोकल सेवा २० मिनिटे तर, हार्बर मार्गावरील लोकल १५ मिनिटे उशिराने सुरू आहेत. तसेच ट्रान्सहार्बर मार्गावरची लोकलसेवा ५ ते १० मिनिटे उशिराने सुरू आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूकही ५ मिनिटे उशिराने सुरू आहे.

राज्य शासनाच्या कंट्रोल रुमने ट्विटकरून महालक्ष्मी एक्सप्रेसबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, मदतकार्य प्रवाशांपर्यंत पोहोचले असून अद्याप ७ जणांना वाचवण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -