घरमुंबईमुंबईतील भीषण अपघातात २ तरूण ठार; भरधाव कार कंटेनरला धडकली

मुंबईतील भीषण अपघातात २ तरूण ठार; भरधाव कार कंटेनरला धडकली

Subscribe

मुंबईतील भांडुप येथे कारच्या भीषण अपघातात २ तरूणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. ठाण्याच्या दिशेने जाताना कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार कंटेनरला जाऊन धडकली.

विकेण्ड म्हटले की धम्माल मजा, मस्तीचा मुड! पण, हाच मुड मुंबईतील दोन तरूणांच्या जीवाववर बेतला आहे. भांडुप फ्लायओव्हरवर झालेल्या भीषण अपघातात २ तरूणांचा मृत्यू झाला तर, ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव कारचे नियंत्रण सुटून कार विरूद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरवर जाऊन धडकली. यामध्ये दोन तरूणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भांडुप उड्डाणपुलावर सकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला आहे. कारची अवस्था पाहून अपघाताची भीषणता आणि वेगाचा अंदाज येतो. ठाण्याच्या दिशेने जात असताना कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजकावरून विरूद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरवर जाऊन धडकली. अपघातामध्ये २१ वर्षीय महेश, २२ वर्षाच्या चिकूचा जागीच मृत्यू झाला. तर, हेमंत शिव गुंडे ( २१ वर्षे ), निहार कोडे, अक्षय मोरे हे तरूण गंभीर जखमी झाले आहेत.

वेगाची नशा जीवावर बेतली

भरधाव वेगाने कार ठाण्याच्या दिशेने जात होती. यावेळी कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि कार विरूद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरवर धडकली. कारची अवस्था पाहिल्यानंतर वेगाचा अंदाज येतो. शिवाय, भरधाव वेग तरूणांच्या जीवावर बेतल्याचे देखील प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -