घरमुंबईमुंबईत कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यासाठी आयुक्तांनी केली तयारी

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यासाठी आयुक्तांनी केली तयारी

Subscribe

मुंबईतील बेडची क्षमता वाढवणार

मुंबईत मागील महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. बुधवारी मुंबईत ५ हजार ३६५ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. जी आजवरची सर्वोच्च रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. मुंबई महानगपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी वाढत्या कोरना परिस्थितीवर आणि कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यासाठी आरोग्य यंत्रणेची तयारी केली आहे. मुंबईत बुधवारी ४७,००० कोरोना चचाण्या करण्यात आल्या यामध्ये ५,३६५ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये १२ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत. तर उर्वरित ८४% रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता मुंबईतील बेड वाढवण्याची तयारी मुंबई महापालिकेने केली आहे.

मुंबई महानगपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मुंबईत सध्या १३,७७३ कोरोना रुग्णांसाठी बेडची संख्या आहे. यातील ५,१४० बेड रिकामे आहेत. परंतु भविष्याचा विचार करता या बेडची संख्या २१ हजार करण्यात येणार आहे.

- Advertisement -

अगामी दिवसांत मुंबईत कोरोना चाचण्या वाढवण्यात येणार असल्यामुळे मुंबईतील बेडची संख्या वाढवण्यात आली आहे. ज्या रुग्णांना कोरोना लक्षणे आहेत. अशा रुग्णांना रुग्णालयात बेडची आवश्यकता आहे. एका दिवसात १० हजार रुग्णांना बेड उपलब्ध करण्याच्या हेतूने ही बेडची संख्या वाढवण्यात आली आहे. एक दिवसाला ६०,००० कोरोना चाचण्या करणार असल्याचे प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

मुंबईत १० लाख लोकांना कोरोना लसीकरण देण्यात आले आहे. आगामी दिवसात कोरोना लसीकरण वाढवणार असून एका दिवसाला १ लाख जणांना कोरोना लसीकरण करणार असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

मुंबईत कोरोना रुग्णांची परिस्थिती वाढली आहे. परंतु वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने सर्व तयारी केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी परिस्थीती हाताळण्यास मुंबई महानगरपालिका सक्षम असल्याचे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -