घरमुंबईमोहन डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केले, कुटुंबीयांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल

मोहन डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केले, कुटुंबीयांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल

Subscribe

सुसाईड नोटमधील हस्ताक्षर मोहन डेलकरांचेच

दादरा नगर हवेलीचे खासदर मोहन डेलकर यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. मोहन डेलकर यांनी त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी खासदार मोहन डेलकर यांनी सुसाईड नोट लिहिली आहे. सुसाईडवरुन असे निष्पन्न झाले आहे की, मोहन डेलकर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले गेले आहे. यामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार मोहन डेलकर यांच्या कुटूंबीयांनी मंगळवारी(९ मार्च) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यांची भेट घेतली आहे. गृहमंत्र्यांनी डेलकर कुटुंबीयांना न्याय मिळवून देऊ असे अश्वासनही दिले आहे.

दादरा नगर हवेलीचे खासदार यांनी आत्महत्येपूर्वी १५ पानांचे सुसाईड नोट लिहिले आहे. या सुसाईड नोटमध्ये डेलकर यांनी भाजप नेत्यांची नावांचा उल्लेख करत कशाप्रकारे या नेत्यांनी त्रास दिला याबाबत स्पष्ट शब्दांत लिहिले आहे. डेलकर यांच्या मृतदेहावर जे.जे रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन केले यामध्ये त्यांनी आत्महत्या केल्याचा अहवाल समोर आला आहे. परंतु मुख्य अहवाल आला नाही. सुसाईडनोटमध्ये असलेले हस्ताक्षर हे डेलकरांचेच असल्याचे त्यांच्या जवळच्या व्यक्तीकडून तपासण्यात आले आहे. तसेच यासाठी हस्ताक्षर तज्ज्ञांच्या मदतीनेही तपासणी करण्यात आले आहे. त्यामुळे सुसाईडनोटमधील हस्ताक्षर हे डेलकर यांचेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

खासदार मोहन डेलकर यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरुन डेलकर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी डेलकर प्रकरणी तपास करण्यासाठी एसआयटीची घोषणा केली आहे. मोहन डेलकर यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांच्यांवर गंभीर आरोप केले आहे. खासदार मोहन डेलकर यांना दादरा नगर हवेलीमध्ये दुटप्पी वागणूक देण्यात येत होती. कोणत्या कार्यक्रमांना त्यांना बोलावण्यात येत नव्हते. डेलकर यांनी याबाबत संसदेत विषय मांडला होता. तसेच याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोपही केले होते. डेलकर यांनी गुजराती भाषेत सुसाईड नोट लिहित आपल्याला कशाप्रकारे त्रास देण्यात येत होता याविषयी लिहिले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -