घरमुंबईमुंबई पोलीस करणार राहुल गांधींची चौकशी

मुंबई पोलीस करणार राहुल गांधींची चौकशी

Subscribe

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात बदनामीकारक ट्विट केल्याप्रकरणी मुंबई पोलीस काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी करणार असून त्याचा अहवाल न्यायालयाला सादर करणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी भोईवाडा कोर्टात दाखल केलेल्या याचिकेनुसार कोर्टाने शिवाजी पार्क पोलीस ठाण्याला हे आदेश दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०१६ साली ट्विट करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात नाहक आणि बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला होता. त्यानंतर रणजित सावरकर यांनी भोईवाडा कोर्टात खटला दाखल केला. त्या अनुषंगाने सुनावणीच्या दरम्यान ते अनुपस्थित राहिले. त्यामुळे अखेर भारतीय दंड संहिता २०२ अन्वये न्यायालयाने पोलिसांना आदेश दिले असून राहुल गांधी यांची तत्काळ चौकशी करण्यास सांगितले आहे. त्यानंतर न्यायालय पुढील कार्यवाही करेल, असे या खटल्यातील सावरकरांची बाजू मांडणारे अधिवक्ता हितेश जैन यांनी सांगितले.

- Advertisement -

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात बदनामी केल्याप्रकरणी भारतीय दंड संहिता ४९९ आणि ५०० अन्वये ही याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरेंची राहुल गांधींवर टीका 

दरम्यान, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्याची स्तुती करत त्यांना भारतरत्न देण्याच्या मागणीचे समर्थन केले आहे. त्या काळी सावरकर जर देशाचे पंतप्रधान असते तर आज पाकिस्तानच जन्मालाच आला नसता, असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, त्यांनी सावरकर यांचा भारतरत्न देऊन गौरव करण्याची मागणी केली. ‘सावरकर: इकोज फ्रॉम अ फरगॉटन पास्ट’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी राहुल गांधीवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, देशासाठी काही काळ नेहरूंनी तुरूंगवास भोगल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. मी त्यांना सागू इच्छीतो की सावरकर यांनी १४ वर्षांचा तुरूंगवास भोगला आहे आणि त्यांनी मरणयातनादेखील भोगल्या आहेत. जर नेहरूंनी अशा यातना भोगल्या असत्या आणि ते १४ मिनिटांसाठी जरी तुरूंगात गेले असते तरी त्यांना नायक म्हणण्यास आमची हरकत नव्हती.तसेच राहुल गांधी यांना पुस्तकाची प्रत दिली पाहिजे, असा टोमणाही ठाकरे त्यांनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -