घरमुंबईमुंबईत होणार अंशत: लॉकडाऊन, पालमंत्र्यांचे संकेत

मुंबईत होणार अंशत: लॉकडाऊन, पालमंत्र्यांचे संकेत

Subscribe

राज्यात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत असतानात मुंबई पून्हा कोरोनाचे मुख्य हॉटस्पॉट बनत आहे. मुंबईत दररोज १ हजारांच्या घरात नवे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे मुंबईच्या आरोग्य यंत्रणा पुन्हा कामाला लागल्या आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेतला राज्यातील अनेक जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊन किंवा नाईट कर्फ्यूचे निर्बंध लावले आहेत. यातच आता मुंबईही अंशत: लॉकडाऊन करण्याचे संकेत पालकमंत्री अस्लम शेख(aslam shaikh)यांनी दिले आहेत. (Mumbai Partial Lockdown)यासंदर्भातील माहिती अस्लम शेख यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. मुंबईत मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुढील आठ ते दहा दिवसांत कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली नाही तर मुंबईत अशंत: लॉकडाऊन लागू केला जाऊ शकतो असे सूचक संकेत मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत. गेल्या २४ तासांत मुंबईत १,३६१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर शनिवारी ११८८ नवे रुग्ण आढळून आले.

त्यामुळे मुंबईत गेल्या २ दिवसांत दोन हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे मुंबईतील आरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. मुंबईसह राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (७ मार्च) मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीत राज्यात वाढत असलेल्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त करण्यात आली. यानंतर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येवर जिल्हा पातळीवर उपाययोजना राबवण्यासह नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -