घरमुंबईकल्याणच्या शाळेचा 'असाही' एक पहिला दिवस!

कल्याणच्या शाळेचा ‘असाही’ एक पहिला दिवस!

Subscribe

हे माझे पहिले पाऊल, विद्याथ्यांची पाटावर बसवून मिरवणूक काढली. शाळेचा असाही साजरा केला पहिला दिवस.

उन्हाळयाच्या सुट्टया संपवल्यानंतर सोमवारपासून शाळा सुरू झाली. नवीन दप्तर,नवीन वहया- पुस्तके आणि गणवेशाने शाळेचा पहिला दिवस सुरू झाला. पण पहिल्यांदाच शाळेत आलेल्या चिमुकल्यांसाठी हा दिवस विशेष समजला जातो. कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेने पहिल्यांदा शाळेत पाऊल टाक-या विद्याथ्यांच्या पाऊलाचे ठसे कागदावर घेऊन ” हे माझे पहिलं पाऊल ” असं स्वागत केलं तर पाटावर बसवून मुलांची मिरवणुकही काढली.

- Advertisement -

शाळेचा पहिला दिवस हा मुलांसाठी खूपच खास आणि आकर्षक समजला जातो. यावेळी विद्याथ्यांप्रमाणे पालकी उत्सुक असतात. मुलांना शाळेत सोडण्याची पालकांची लगबग दिसून येते. सोमवारीही ही लगबग सर्वत्रच पहावयास मिळाली. पहिल्यांदाच पालक मुलांना शाळेत सोडून जात असताना यावेळी मुलांचे डोळेही पाणावल्याचे दिसून आले. तर अनेकांनी शाळेतून पालकांबरोबर जाण्यासाठी हट्ट धरला होता. पहिल्याच दिवशी मुलांचे शाळेत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळया पध्दतीने स्वागत करण्यात आले.

कल्याणच्या शाळेचा अभिनव उपक्रम

काही ठिकाणी मुलांचे औक्षणही करण्यात आले तर अनेकांनी शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप केले. मात्र कल्याण तालुक्यातील बापसई गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेने आगळया वेगळया पध्दतीने चिमुकल्यांचे केलेले स्वागत आकर्षक ठरलं. शाळेत पहिले पाऊल टाकणाऱ्या मुलांची पाटावर बसवून गावात मिरवणूक काढण्यात आली. बुध्दीची देवता गणपतीची अशा पध्दतीने मिरवणुक काढली जाते. तसेच मुलांच्या पहिल्या पाऊलाचे ठसे ही कागदावर घेण्यात आले. हे “माझे पहिले पाऊल” अश्या वेगळा उपक्रमतून मुलांचे स्वागत केले. त्यामुळे मुलांप्रमाणेच शिक्षकांमध्येही आनंद आणि उत्साह दिसून येत होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -