घरमुंबईNew Year 2024 : मुंबईतही नववर्षाच्या स्वगतासाठी तोबा गर्दी; 'या' ठिकाणी नागरिकांनी...

New Year 2024 : मुंबईतही नववर्षाच्या स्वगतासाठी तोबा गर्दी; ‘या’ ठिकाणी नागरिकांनी लुटला मनमुराद आनंद

Subscribe

मुंबई : योगायोगाने रविवारी आलेल्या ‘थर्टी फर्स्ट’च्या निमित्ताने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबईत गर्दीचा पूर आला होता, तर आज सोमवारी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाचे स्वागत करण्यासाठी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, चौपाट्या, रेल्वे स्थानके आदी ठिकाणी पर्यटकांची गर्दी दिसून आली. मुंबईकर, बाहेरील पर्यटक आदीं लाखो लोकांनी वाढत्या ‘कोरोना’ला न जुमानता एकच गर्दी केल्याचे दिसून आले. यामध्ये प्रेमी युगल, महिला मंडळी, काही प्रमाणात कुटुंबे व बच्चे कंपनी यांनी चांगलीच गर्दी केल्याचे दिसून आले. (New Year 2024 crowd for New Year Eve in Mumbai too Citizens robbed Manmurad Anand at this place)

हेही वाचा – Mumbai Covid Update : मुंबईत कोरोनाचे 130 रुग्ण सक्रिय; सुदैवाने अद्याप एकही मृत्यू नाही 

- Advertisement -

अगदी सकाळच्या आणि दुपारच्या वेळेत ठाणे, कल्याण, पनवेल मार्गे रेल्वे गाड्यांमध्ये सीएसएमटीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या मुंबईकर, बाहेरील पर्यटकांची मोठी गर्दी दिसून आली. त्याचप्रमाणे आज सायंकाळपासून रात्री नऊ वाजेपर्यंत पनवेल, नवी मुंबई भागात जाण्यासाठी सीएसएमटी रेल्वे स्थानकात हार्बर रेल्वे मार्ग फलाटांवर आणि मध्य रेल्वेच्या कर्जत, खोपोली, शहापूर, ठाणे आदी दिशेने परतीचा प्रवास करण्यासाठी सीएसएमटी रेल्वे स्थानकात तोबा गर्दी केल्याचे निदर्शनास आले. याशिवाय फिल्म सिटी, फिल्मी कलाकार, जुहू, गिरगाव, दादर, अक्सा चौपाटी, गेट वे ऑफ इंडिया, राणी बाग, आदी पर्यटन ठिकाणी मुंबईकर, बाहेरील पर्यटकांची गर्दी दिसून आली. विशेषतः बच्चे कंपनीने तर ‘थर्टी फर्स्ट’ जोरदार मस्ती करीत चौपाट्यांवर, समुद्रात मनमुराद आनंद लुटला. मात्र रात्री सीएसएमटी रेल्वे स्थानकात घरी परतणाऱ्या नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती.

हेही वाचा – Babanrao Gholap मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी थेट मंत्रालयात; उद्धव ठाकरेंना अजून एक धक्का बसणार?

- Advertisement -

अनेकांनी तर ‘थर्टी फर्स्ट’ सोबत सोमवारी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठीही रेल्वे स्थानकात पर्यटकांनी, मुंबईकरांनी चांगलीच गर्दी केली होती. त्यातही काही प्रेमी युगल, मित्र-मंडळी यांनी तर सीएसएमटी रेल्वे स्थानकातच मोबाईल बाहेर काढून ‘सेल्फी’चा आनंदही लुटला. त्यांनी मुंबईमधून घरी जाताना आपल्या सोबत ‘थर्टी फर्स्ट’ आणि ‘नवीन वर्ष’ यांचा लुटलेला आनंद नेला. तर काही नवख्या लोकांची रात्री सीएसएमटी रेल्वे स्थानकात घरी जाण्यासाठी ट्रेन पकडताना धावपळ झाल्याचे निदर्शनास आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -