घरमुंबईमुंबई पोलीस मुख्यालयात चुकून सुटलेल्या गोळीबारात एक जखमी

मुंबई पोलीस मुख्यालयात चुकून सुटलेल्या गोळीबारात एक जखमी

Subscribe

खमी सचिनच्या हातावर गोकुळदास तेजपाल रुग्णालयात बुधवारी शस्त्रक्रिया पार पडली असून जखम झालेल्या ठिकाणी प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार असल्याची माहिती सचिनच्या नातेवाईकांनी दिली.

मुंबई पोलीस आयुक्त मुख्यालयात अग्निशस्त्राचा परवाना नूतनीकरणासाठी आलेल्या एका व्यक्तीच्या रिव्हाल्वरमधून चुकून गोळी सुटली. ही गोळी त्याच व्यक्तीच्या उजव्या हातात घुसली. यामध्ये ही व्यक्ती जखमी झाली आली असून तिच्यावर गोकुळदास तेजपाल रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना मंगळवारी दुपारी पोलीस मुख्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये घडली. सचिन ताम्हणकर (४० वर्ष) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

अशी घडली घटना

सचिन हा क्रॉफर्ड मार्केट येथील अग्निशस्त्राच्या दुकानात नोकरी करतो. एका ग्राहकाने शस्त्र वापरण्याचा परवाना नूतनीकरण करण्यासाठी पिस्तूल आणि परवाना काही दिवसापूर्वी दुकानात जमा केले होते. दरम्यान, मंगळवारी दुपारी मालकाने सचिनला ग्राहकाचे पिस्तूल आणि परवाना नूतनीकरण करण्यासाठी मुंबई पोलीस मुख्यालय येथे पाठवले होते. सचिन पोलीस मुख्यालयातील नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पिस्तूलचा परवाना नूतनीकरण करण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याने पिस्तूल नूतनीकरण विभागाच्या टेबलावर ठेवत असताना त्यातून चुकून गोळी सुटली आणि ती सचिनच्या उजव्या हाताला लागून भिंतीत घुसली.

- Advertisement -

सचिनच्या हातावर शस्त्रक्रिया केली

गोळीच्या आवाजाने पोलीस मुख्यालयाच्या नवीन इमारतीत एकच गोंधळ उडाला. मुख्यालयातील पोलिसांनी ताबडतोब जखमी सचिनला उपचारासाठी नजीकच्या गोकुळदास तेजपाल रुग्णालयात दाखल केले. आझाद मैदान पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. जखमी सचिनच्या हातावर गोकुळदास तेजपाल रुग्णालयात बुधवारी शस्त्रक्रिया पार पडली असून जखम झालेल्या ठिकाणी प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार असल्याची माहिती सचिनच्या एका नातेवाईकाने दिली आहे. याबाबत आझाद मैदान पोलिसांकडे संपर्क साधून घटनेसंबंधी अधिक माहिती विचारली असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला.

हेही वाचा – 

- Advertisement -

पुण्यात प्रियकराचा प्रेयसीच्या हॉस्टेलमध्ये गोळीबार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -