घरमुंबईएल्फिन्स्टन दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण; शिवसेनेची भावपूर्ण श्रद्धांजली

एल्फिन्स्टन दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण; शिवसेनेची भावपूर्ण श्रद्धांजली

Subscribe

प्रभादेवी रेल्वे स्टेशन (पुर्वीचे एल्फिन्स्टन) इथल्या दुर्दैवी अपघातात मरण पावलेल्या निष्पाप नागरिकांना शिवसेनेन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. २९ सप्टेंबर २०१७ ला हा दुर्दैवी अपघात झाला होता. यात २३ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर सुमारे ४० जण गंभीररीत्या जखमी झाले होते. या दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी प्रभादेवी स्थानकाबाहेर पुष्प अर्पण करून मृतांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

तो काळा दिवस होता…

या अपघातातून सुखरुप बचावलेली शिल्पा विश्वकर्मा आणि अंकुश परब यांनी देखील यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. अंकुश परब यांची दोन्ही मुले या दुर्घटनेमध्ये सापडली. एक मुलगा रोहित जो १२ वर्षांचा होता, त्याचा मृत्यु झाला तर दूसरा मुलगा आकाश हा मात्र वाचला. त्यावर केईएम हॉस्पिटलमध्ये दीर्घकाळ उपचार सुरु होते. मात्र एका पायने तो अधू झाला आहे. आता रेल्वेने त्याला नोकरी द्यावी, अशी इच्छा त्यांनी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्याकडे व्यक्त केली आहे. तर अपघातात बचावलेली शिल्पा विश्वकर्मा त्यावेळचा दिवस म्हणजे काळा दिवस असल्याचे सांगत आहे. इथे रेल्वे प्रशासनाने नवीन पादचारी पूल निर्माण केला आहे. भारतीय सैन्यांनी फुलमार्केट ते परळ रेल्वे स्थानक पूल बांधला आहे. पण तरिही कॉर्पोरेट ऑफिसेला येणाऱ्या लोकांसाठी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा स्कायवॉक बांधावा, अशी मागणी अनेकांकडून होत आहे.

- Advertisement -
shiv sena paid tribute
शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे

वास्तविक, २०१४ पासून प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील दुर्घटनाग्रस्त पुलाच्या दुरुस्तीसाठी अनेकदा रेल्वे प्रशासनाकडे लेखी मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने त्यावर कारवाई करण्यास दिरंगाई केल्याने ही दुर्घटना घडली. आताही, मुंबईतील सुमारे ४० हुन अधिक फूट ओव्हर ब्रिज (एफओबी) आणि रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) च्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे वारंवार लेखी मागणी केली आहे. परंतु यावर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. तसेच राज्य शासनाने यासाठी नेमलेल्या विशेष समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. – राहुल शेवाळे, शिवसेना खासदार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -