घरमुंबईहॉटेलसाठीचा ठराव रद्द करण्याची मागणी

हॉटेलसाठीचा ठराव रद्द करण्याची मागणी

Subscribe

टीकेची झोड उठल्याने सेनेला उपरती

मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील मीरारोडच्या मंगलनगर जवळील उद्यानासाठीच्या आरक्षण क्र. 305 चा दर्शनी भाग एका बार व लॉज चालकास हॉटेलसाठी वगळण्याचा भाजपच्या ठरावास पाठिंबा दिल्याने शिवसेनेची पंचाईत झाली होती. याप्रकरणी शिवसेनेने घुमजाव केले असून शिवसेना नगरसेवकांची ती अवधनाने चूक झाल्याचे सांगत आमदार प्रताप सरनाईक यांनी सदरचा ठराव रद्द करुन झालेले बांधकाम तोडण्याचे पत्र महापौर व आयुक्तांना दिले आहे. सेनेच्या या भूमिकेमुळे आता सत्ताधारी भाजपाची अडचण वाढली आहे.

आरक्षणाने बाधित बांधकाम व त्याचे क्षेत्र आरक्षणातून वगळुन तेथे हॉटेल सुरु करण्याची मागणी बार – लॉज व्यावसायिक संतोष पुत्रण यांनी चालवली होती. संतोष पुत्रण हे भाजप नगरसेवक अरविंद शेट्टी यांचे भागीदार असून शेट्टी हे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या जवळचे मानले जातात. त्या अनुषंगाने हा प्रस्ताव आणला जात होता. 31 जानेवारीच्या महासभेत महापौर डिंपल मेहता यांनी हॉटेलसाठी आरक्षण कमी करण्याचा प्रस्ताव आणला असता भाजपाच्या नगरसेवकांनी अनुमोदन दिले होते. सेनेचे नगरसेवक विरोधात होते. मात्र गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांनी ठरावाच्या बाजुने हात वर करा सांगीतले. सेनेच्या स्नेहा पांडे, तारा घरत व कुसुम गुप्ता मात्र तटस्थ राहिल्या. भाजपाचे उपमहापौर चंद्रकांत वैती, भाजपा नगरसेवक अश्विन कासोदरीया, निला सोन्स, दौलत गजरे तटस्थ राहिले होते. तर आमदार गीता जैन यांनी विरोध केला होता. काँग्रेसने हॉटेलविरोधात ठराव मांडला होता.

- Advertisement -

या वादग्रस्त प्रकरणात भाजपाची साथ दिल्याने भाजपासोबत शिवसेनेवर टिकेची चांगलीच झोड उठली होती. शिवसेना शाखा प्रमुख महेश शिंदे यांनी तर ठराव हा बार – लॉज चालकाच्या व्यक्तीगत आर्थिक फायद्याचा असल्याचा आरोप करत आयुक्तांसह नगरविकास विभाग आदिंना ठराव रद्द करुन अर्धवट अवस्थेतील बांधकाम तोडावे आणि उद्यान विकसीत करावे अन्यथा आंदोलन करु असे खरमरीत पत्र दिले होते.

सदर आरक्षण आ. सरनाईकांच्या मतदार संघात व त्यांच्या कार्यालयाच्या बाजूलाच असताना सेना नगरसेवकांनी पाठींबा दिल्याने सेनेची चांगलीच पंचाईत झाली होती. अखेर स्वत: सरनाईकांनीच महापौर डिंपल मेहता व आयुक्त बालाजी खतगावकर यांना पत्र देऊन महासभेत झालेला फेरबदलचा ठराव रद्द करण्याची मागणी केली आहे. प्रसिध्दी माध्यमातुन आलेल्या बातम्यांमुळे नगरसेवकांना वस्तुस्थिती कळली असून प्रशासनाकडून दिशाभूल झाली असल्याचे म्हटले आहे.
बार – हॉटेलला नागरिकांचा विरोध असून सदर अनधिकृत बांधकाम तोडण्याची मागणी आपण वर्षभराआधीच लेखी पत्र देऊन महापालिकेला केली आहे. परंतु महापालिकेने त्यावर कारवाई न केल्याने ही परिस्थती उद्भवली आहे. त्यामुळे ठराव विखंडीत करून जागेवरच असलेले अनधिकृत बांधकाम पाडुन उद्यान विकसीत करावे अशी मागणी सरनाईकांनी केली आहे.

- Advertisement -

वास्तविक आरक्षणातील जागा हॉटेलसाठी वगळण्यास शिवसेनेचा विरोध असला तरी याआधी देखील सदर प्रस्ताव महासभेत आला होता. याच प्रस्तावाच्या पुढचा विषय हा चेणे येथे रस्ता प्रस्तावित करण्याचा होता. सदर विषय आ. सरनाईकांशी संबंधित असल्याने भाजपा तो मंजुर करत नव्हती. त्यातुनच भाजपाने आधी आमच्या हॉटेलच्या प्रस्तावाला साथ द्या तर तुमचा प्रस्ताव महासभेत मंजुर करतो अशी अट सेना नेतृत्वाला घातल्याची चर्चा आहे. सेनेने आरक्षण वगळण्याच्या ठरावाला साथ दिल्यानंतर भाजपाने महासभेत प्रलंबित चेणे रस्त्याचा विषय मंजुर केला. भाजपाकडे स्पष्ट बहुमत असल्याने त्यांना सेनेची गरज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -