घरमुंबईरक्तदान शिबीराचे आयोजन

रक्तदान शिबीराचे आयोजन

Subscribe

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती(२६ जून) हा दिवस राज्यात ‘सामाजिक न्यायदिन’ म्हणून साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ व कोल्हापूर जिल्हा रहिवाशी शिवशाहू प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर रविवार दिनांक ३० जून सकाळी ८ ते दुपारी ३ वाजे पर्यंत लोअर परेलच्या ना.म.जोशी.मार्ग मुन्सिपल शाळेच्या तळ मजल्यावर आयोजित करण्यात आले आहे. या सामाजिक उपक्रमाला तरुणांना शरीरसौष्ठव(बॉडी बिल्डिंग) मध्ये प्रेरणा देणारे जागतिक किर्तीचे शरीरसौष्ठवपटू सुहास खामकर उपस्थित राहणार आहेत. या रक्तदान शिबिराला बृहन्मुंबई महानगपालिकेच्या नायर हॉस्पिटलचे सहकार्य लाभणार आहे.तसेच रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात येईल. इच्छुक रक्तदात्यांनी आपली नोंदणी जीवन भोसले 9819591150, कृष्णा पाटील 9870565122 या क्रमांकावर करावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -