घरमुंबईPhotos: आशियातील सर्वात मोठी टाटा मुंबई मॅरेथॉन; श्रीरामाचा जयघोष, भगवे झेंडे घेऊन...

Photos: आशियातील सर्वात मोठी टाटा मुंबई मॅरेथॉन; श्रीरामाचा जयघोष, भगवे झेंडे घेऊन धावले धावपटू

Subscribe

आशियातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित टाटा मुंबई म‌ॅरेशॉनला आज, रविवारी 21 जानेवारीला सुरूवात झाली. या मॅरेथॉनसाठी संपूर्ण मुंबईनगरी सज्ज झाली होती.

मुंबई: आशियातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित टाटा मुंबई म‌ॅरेशॉनला आज, रविवारी 21 जानेवारीला सुरूवात झाली. या मॅरेथॉनसाठी संपूर्ण मुंबईनगरी सज्ज झाली होती. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय धावपटू सुद्धा सज्ज झाले. ऑलिम्पिक पदक विजेती आणि दोन वेळा जगज्जेती ठरलेली पोल व्हॉल्ट पटू केटी मून ही या टाटा मुंबई मॅरेथॉन 2024 ची आंतरराष्ट्रीय अॅम्बेसेडर आहे. या मॅरथॉनचे फोटो पाहा. (Photos Asia s Biggest Tata Mumbai Marathon Shree Rama s shout runners ran with saffron flags)

- Advertisement -

या मॅरेथॉनवेळी राज्यपाल रमेश बैस, मुंबईचे पालकमंत्री दीपत केसरकर, मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या उपस्थितीत म‌‌ॅरेथॉनला सुरूवात करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील यावेळी उपस्थिती लावली होती.

- Advertisement -

मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या धावपटूंनी भगवे कपडे परिधान करून, भगवा फेटा घालून मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. या वातावरणात धावपटींचा उत्साह वाढवण्यासाठी मुंबई मॅरेथॉन आयोजन समितीकडूनही ध्वनीक्षेपकावर भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, हे गाणं वाजवलं जात आहे.

मुंबई म‌ॅरेथॉन 2024 या स्पर्धेचं 19 वं पर्व रविवार, 21 जानेवारी रोजी पार पडत असून मुंबईच्या रस्त्यांवर बहुसंख्य नागरिक आणि धावपटू धावले. यावेळी त्यांच्यासोबत मुंबईचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनीही सहभाग घेतला.

42.195 किलो मीटरची मुख्य मॅरेथॉन ही पहाटे 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -