घरमुंबईराज ठाकरेंचा जैन समाजाला पाठिंबा, 'या' वादग्रस्त प्रकरणासाठी झारखंड सरकारला केली विनंती

राज ठाकरेंचा जैन समाजाला पाठिंबा, ‘या’ वादग्रस्त प्रकरणासाठी झारखंड सरकारला केली विनंती

Subscribe

Shri Sammed Shikharji | मुंबई – केंद्र सरकारने झारखंडमधील जैन समाजाचे तीर्थधाम सम्मेद शिखर पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले आहे. मात्र, हे धर्मस्थळ पर्यटन म्हणून घोषित होऊ नये अशी मागणी जैन समाजाने (Jain Community) केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात जोरदार आंदोलन केले जात आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena Leader Raj Thackeray) यांनी जैन समाजाला पाठिंबा दर्शवला आहे.

हेही वाचा – खोटं बोलून कसा खेळ…; डिलीट ट्वीटवरून जितेंद्र आव्हाडांची सारवासारव

- Advertisement -

राज ठाकरे म्हणतात की, झारखंडमधल्या गिरीहीद जिल्ह्यातलं ‘सम्मेद शिखरस्थळ’ हे जैन धर्मियांचं पवित्रस्थळ आहे. ह्या धर्मस्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊ नये, कारण एकदा का ते पर्यटनस्थळ म्हणून घोषित झालं की तिथे जैन धर्माला मान्य नसलेल्या अनेक गोष्टी घडू शकतील अशी जैन बांधवांची भावना आहे.

पुढे राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जैन बांधवांच्या मागणीशी पूर्ण सहमत आहे. झारखंड सरकारने जैन धर्मियांच्या तीव्र भावनांचा विचार करून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, आणि हे होत नसेल तर केंद्र सरकारने ह्यात त्वरित हालचाल करावी.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -