घरमुंबईतनुश्री लेस्बियन असून तिने माझ्यावर बलात्कार केला होता - राखी सावंत

तनुश्री लेस्बियन असून तिने माझ्यावर बलात्कार केला होता – राखी सावंत

Subscribe

मुली काम मिळवण्यासाठी काहीही करायला तयार होतात असा खळबळजनक आरोप तिने केला आहे. “मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हात जोडून विनंती करतेय बेटी बचाओ मोहिमेप्रमाणेच आता आदमी बचाओ मोहीमही सुरू करा” असं राखीने पत्रकार परिषदे दरम्यान म्हटले आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या मिटूची मोहिम जास्त गाजत आहे. यामध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर शूटिंग दरम्यान छेडछाड केल्याचा आरोप केला होता. नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांचा वाद थांबायचे नाव घेत नाहीये. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केले आरोप खोटे असल्याचे आयटम गर्ल राखी सावंतने म्हटले होते. राखीने तनुश्रीला ड्रग अॅडीक्ट म्हटले होते. त्यावर तनुश्री दत्ताने राखी सावंतवर १० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला होता. यावर आज राखी सावंतने पत्रकार परिषद घेऊन तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. तनुश्री दत्ता ही लेस्बियन असल्याचाही दावा तिने केला आहे. आता राखी सावंतने पलटवार करत तनुश्री दत्तावर ५० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला आहे.

मुली काम मिळवण्यासाठी काहीही करतात

राखी सावंतने आज चक्क नववारी साडी नेसून पत्रकार परिषद घेतली. तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला असून त्याचे दोन साक्षीदार असल्याचे राखीने सांगितले आहे. या दोन्ही साक्षीदारांची नावे राखीने सांगितले नाही मात्र या साक्षीदारांना मी कोर्टासमोर हजर करेल असे तिने सांगितले. बॉलिवूडमधील लोकं कधीच बलात्कार करत नाही असे देखील तिने म्हटले आहे. मुली काम मिळवण्यासाठी काहीही करायला तयार होतात असा खळबळजनक आरोप तिने केला आहे. “मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हात जोडून विनंती करतेय बेटी बचाओ मोहिमेप्रमाणेच आता आदमी बचाओ मोहीमही सुरू करा” असं राखीने पत्रकार परिषदे दरम्यान म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

Part 3 #meetoo #rakhisawant reaction on #tanushree defamation case ….. @waahiidakhan

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

- Advertisement -

५० कोटीचा मानहानीचा दावा

दरम्यान राखी सावंतने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राखीने असे म्हटले आहे की, तुम्ही कोणालाही खालच्या दर्जाचे बोलून शकत नाही. तनुश्रीने मला खालच्या दर्जाचे म्हटले आहे. ज्यासाठी मी लवकरच तिच्याविरोधात ५० कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार आहे. तनुश्री दत्ता हे सर्व पब्लिस्टि स्टंटसाठी आणि बँकेमध्ये पैसा जमा करण्यासाठी करत आहे. तिच्याकडे पैसे नव्हते आणि येताच तिच्याकडे रेड ऑडी आली. जर मी चूकीची असेल तर मला जेलमध्ये टाका. मी महिलेला सपोर्ट करत नाही ना पुरुषाला सपोर्ट करत आहे. मी सत्याला सपोर्ट करत आहे. तसंच मीटू मोहिम योग्य दिशेने जात नाहीये. या मोहिमेला भरकटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राखी सावंतने सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

Part 5 #meetoo #rakhisawant reaction on #tanushree defamation case ….. @waahiidakhan

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -