घरमुंबईपेंग्विनमुळे पालिका 'मालामाल'

पेंग्विनमुळे पालिका ‘मालामाल’

Subscribe

वर्षभरात ५ कोटींची कमाई

मुंबई । अजेयकुमार जाधव

प्राण्यांची होत असलेली आबाळ आणि मुंबई महानगर पालिकेच्या सततच्या दुर्लक्षामुळे अडचणीत आलेल्या भायखळातील वीरमाता जिजामाता उद्यानाला आता ‘अच्छे दिन ‘येत आहेत. कारण पेंग्विनच्या आगमनानंतर उद्यानाच्या कमाईत कमालीची वाढ झाली असून वर्षाकाठी साधारण ७० लाख रुपयांचा पल्ला गाठणाऱ्या उद्यानाने पेंग्विनमुळे यावर्षी ५ कोटींची गल्ला जमवला आहे.

- Advertisement -

हंबोल्ट पेंग्विनचे वाढते आकर्षण

भायखळा येथील वीरमाता जिजामाता उद्यान म्हणजेच राणीबाग पालिकेकडून जवळपास दुर्लक्षित झालेले उद्यान होते. या उद्यानात पालिकेने हंबोल्ट पेंग्विन विकत आणल्यानंतर तिथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. उद्यानातील प्राणिसंग्रहालयाचे संचालक संजयकुमार त्रिपाठी यांनी याचे श्रेय पेंग्विनना दिले. मुंबईतील बच्चे कंपनीचे आवडते स्थान म्हणजे भायखळा येथील राणीबाग. राणीबागमधील हंबोल्ड पेंग्विन कक्षाचे मागील वर्षी मार्च महिन्यात लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर काही महिने पेंग्विन दर्शन मोफत देण्यात आले. ऑगस्ट महिन्यापासून पेंग्विन पाहण्यासाठीचे दर पालिकेकडून वाढवण्यात आले. जास्त दर लागू केल्याने पर्यटकांची संख्या कमी होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र पेंग्विन पाहण्यासाठी येणाèया पर्यटकांची संख्या सतत वाढतच आहे, असे संजीवकुमार म्हणाले.

नुतनीकरणही लोकांच्या पसंतीस

पेंग्विनच्या आगमनापासून राणीच्या बागेचे नुतनीकरण आणि सौंदर्यीकरणाचे काम जोरात सुरु आहे. थीम बेस ब्युटिफिकेशन करण्यात येत असल्यामुळे उद्यानाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. गार्डन, जापनीज गार्डन, वॉटर फॉल सेल्फी पॉइंर्ट यामुळे पर्यटकांमध्ये उद्यानाविषयीही आकर्षण वाढले आहे.

- Advertisement -

पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ

२०१६-१७ मध्ये राणीबागेला भेट देणाऱ्या पर्यटकांची वर्षातील संख्या १३ लाख होती. या पर्यटकांच्या माध्यमातून पालिकेला महिन्याकाठी सुमारे ६७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. पेंग्विन आल्यानंतर पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊन २०१८ मध्ये ती १९ लाखांवर गेली. या माध्यमातून पालिकेच्या गल्ल्यात ४ कोटी ३७ लाख ५३ हजार ३९८ रुपयांचे उत्पन्न जमा झाले. या सुटीतील एप्रिल महिन्यात राणीच्या बागेला १ लाख २५ हजार पर्यटकांनी भेट दिली. या एका महिन्यात पालिकेला ५२ लाखांची कमाई झाली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -