घरमुंबईराजू शेट्टींना धक्का; रविकांत तुपकर यांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

राजू शेट्टींना धक्का; रविकांत तुपकर यांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

Subscribe

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आज, गुरुवारी पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी संघटनेच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे. तसे रविकांत तुपकर यांनी स्वाक्षरीनिशी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांना पत्र पाठवले आहे. राज्यात महायुतीची सत्ता आल्यावर रविकांत तुपकर यांच्याकडे महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष पद सोपवण्यात आले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी महायुतीविरोधात भूमिका घेतल्यानंतर तुपकर यांनी त्या पदाचा राजीनामा दिला होता.

काय म्हटले आहे पत्रात

मी अनेक वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत एक सक्रीय कार्यकर्ता म्हणून कार्यरत होतो. माझ्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. परंतु आज मी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. असे रविकांत तुपकर यांनी स्वाक्षरीनिशी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांना पत्र पाठवले आहे.

- Advertisement -
राजीनामा

तुपकरांच्या निर्णयावर राजू शेट्टी यांनी त्यांना तुम्ही संघटनेत अनेक वर्षे कामं केली असल्याचे सांगून पुन्हा एकदा या निर्णयाबद्दल विचार करावा, असे सांगितले होते. मात्र, काही वेळानंतर तुपकर यांनी थेट राजीनामा पत्र लिहूनच पाठवले. तुपकर हे भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे, विशेष म्हणजे त्यांनी कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यांचा चिखली हा विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहे. तर सध्या येथे काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे निवडून आले आहेत. तुपकर हे राजू शेट्टी यांचे खंद्दे समर्थक मानले जात होते. सदाभाऊ खोत संघटनेतून बाहेर पडल्यानंतर तुपकर हेच दोन नंबरचे नेते होते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच त्यांना संघटनेची साथ सोडल्याने राजू शेट्टी यांना मोठा धक्का बसला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -