घरमुंबईमुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय बर्वेंची नियुक्ती

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय बर्वेंची नियुक्ती

Subscribe

दत्ता पडसलगीकरांच्या निवृत्तीनंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर संजय बर्वेंची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली आहे.

देशात दहशतवाद विरोधी वातावरण निर्माण झालेलं असताना आणि सुरक्षेच्या दृष्टीने इतर प्रमुख शहरांसोबतच मुंबईत देखील हाय अलर्ट देण्यात आलेला असतानाच मुंबईच्या पोलीस दलात मोठे फेरबदल झाले आहेत ६ महिने मुदतवाढ देण्यात आलेले पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर आज बुधवार २८ फेब्रुवारी रोजी निवृत्त होत असल्यामुळे त्यांच्या जागी मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांना बढती देऊन पोलीस महासंचालक पदी नेमण्यात आले आहे. तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांची मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सीमेवरील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या पोलीस दलात झालेले हे बदल महत्त्वाचे मानले जात आहेत.

- Advertisement -

कोण आहेत संजय बर्वे?

१९८६च्या बॅचचे आयपीएस अधिकारी संजय बर्वे राज्याच्या गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख म्हणूनही काम पाहिल्यामुळे मुंबईतील परिस्थितीवर त्यांच्याकडून सक्षमपणे काम होण्याची अपेक्षा ठेवली जात आहे. तर सुबोधकुमार जैस्वाल हे त्यांना एक वर्षाने सीनिअर म्हणजेच १९८५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पोलीस महासंचालकपदी सुबोधकुमार जयस्वाल यांची वर्णी लागणार हे जरी निश्चित झाले होते, तरी त्यांच्या जागी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कुणाची नियुक्ती होणार? याविषयी बरीच चर्चा होती. या पदासाठी संजय बर्वे यांच्यासोबतच राज्याचे अप्पर महासंचालक कायदा व सुव्यवस्था परमबीर सिंग यांचं नाव आघाडीवर होतं. मात्र अखेर संजय बर्वे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

Mumbai Police Commissioner Sanjay Barve
मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -