घरमुंबईपाळीव प्राणी विकताय?

पाळीव प्राणी विकताय?

Subscribe

प्राणी कल्याण मंडळाचा परवाना बंधनकारक

महापालिकेच्या गुमास्ता परवान्याच्या आधारे मुंबईत पाळीव प्राण्यांच्या विक्रीची दुकाने थाटली जात असून अनधिकृतपणे चालवणार्‍या जाणार्‍या दुकानांविरोधात आता महापालिकेच्यावतीने कडक कारवाई केली जाणार आहे. मुंबईत पाळीव प्राण्यांच्या विक्रीच्या दुकानांसाठी आता महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाचा परवाना आवश्यक आहे. जर या मंडळाच्या परवान्याविना पाळीव प्राण्यांची विक्री करणार्‍या दुकानांवर जिल्हा एसपीसीएद्वारे कारवाई केली जाणार आहे.

मुंबईत महात्मा ज्योतिबा फुले मंडई अर्थात क्रॉफर्ड मार्केटसह अनेक ठिकाणी पाळीव पक्षी व प्राण्यांच्या विक्रीची दुकाने आहेत.मुंबईत क्रॉफर्ड मार्केटमध्ये पाळीव प्राण्यांची दुकाने सर्वाधिक असून याठिकाणी विविध प्रजातींचे आकर्षक व देखणे पक्षी व प्राण्यांची खुलेआम विक्री केली जाते. महापालिकेच्या गुमास्ता परवान्याच्या आधारेच ही दुकाने थाटली जातात. दोन वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने क्रॉफर्ड मार्केटमधील पाळीव प्राण्यांचा बाजार बंद करावा,असे निर्देश दिले होते. त्यादृष्टीकोनातूनच आता पुढे पावले पडू लागली आहेत.

- Advertisement -

मुंबईत क्रॉफर्ड मार्केटसह इतर ठिकाणी सुमारे २२०० हून अधिक पाळीव प्राण्यांची दुकाने आहेत. यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने, त्यांना यापुढे महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाचा परवाना घेणे बंधनकारक करण्यात आल्याचे प्राणी कल्याण मंडळाच्या अशासकीय सदस्या अ‍ॅड.अंबिका हिरानंदानी यांनी सांगितले. यासंदर्भात देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक योगेश शेट्ये यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, प्राण्यांवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार पाळीव पक्षी व प्राण्यांच्या दुकानांना प्राणी कल्याण मंडळाचा परवाना बंधनकारक करण्यात आल्याचे सांगितले. मात्र, ज्या दुकानांकडे हा परवाना नसेल त्यांच्याविरोधात जिल्हा एसपीसीएद्वारे कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील प्रत्येक जिल्हयात प्राण्यांवर होणाऱ्या क्रूरतेपासून बचाव करण्यासाठी एसपीसीएची स्थापना केली आहे. या सोसायटी द्वारे पाळीव प्राण्यांच्या दुकानावर कारवाई केली जाईल.

अशा प्रकारे प्राण्यांना दिला जातो त्रास

- Advertisement -

विक्रीसाठी दुकानांमध्ये आणण्यात येणार्‍या प्राणी-पक्ष्यांची तस्करी, अशास्त्रीय पद्धतीने करण्यात येणारे त्यांचे प्रजनन, योग्य प्रशिक्षणाविना त्यांच्यावर करण्यात येणारे उपचार या गोष्टींना सामाजिक संस्थांचा आक्षेप आहे. कुत्र्यांच्या पिल्लांना जन्मल्यानंतर लगेचच त्यांच्या आईपासून दूर करण्यात येते व नंतर त्यांना धुंदीचे इंजेक्शन देऊन पिंजर्‍यात डांबून ठेवण्यात येते. छोटेखानी पिंजर्‍यात एकाच वेळी अनेक पक्ष्यांना कोंडून ठेवणे, एवढेच नव्हे, तर गरम चाकूने त्यांची चोच कापणे, तर ओरबाडता येऊ नये म्हणून मांजरींची नखे कापण्यात येतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -