घरमुंबईShare Market Today : बजेटपूर्वी शेअर बाजार जोरदार आपटला; सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, आठ...

Share Market Today : बजेटपूर्वी शेअर बाजार जोरदार आपटला; सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, आठ लाख कोटींचे नुकसान

Subscribe

मुंबई : मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजारात मोठी नफा-वसुली झाली त्यामुळे बजेट आणि बेंचमार्क निर्देशांक कोसळले.  आज सकाळी जोरदार सुरुवात करूनही सेन्सेक्स आणि निफ्टी घसरले असून लाल रंगात बंद झाले आहे. सेन्सेक्स 1,053.10 अंकांनी किंवा 1.47 टक्के घसरणीसह 70,370.55 वर बंद झाला, तर दुसरीकडे निफ्टी 333.00 अंकांनी किंवा 1.54 टक्के घसरून 21,238.80 वर बंद झाला. (Share Market Today Stock market hit hard ahead of budget Sensex Nifty collapses loss of Rs 8 lakh crore)

हेही वाचा – Sushama Andhare : देवाभाऊंनी ‘पहाटे-दुपारी’ दोनदोनदा लव्ह मॅरेज केलं; श्रीरामाचा दाखला देत अंधारेंची टीका

- Advertisement -

आजच्या व्यवहार सत्रात बाजारात बँकिंग, मेटल, रियल्टी आणि मीडिया क्षेत्रात जोरदार विक्री दिसून आली. मात्र केवळ फार्मा सेक्टरच्या शेअर्समध्ये खरेदी दिसून आल्यामुळे बाजाराला बळ मिळू शकले नाही. त्यामुळे बाजार शेवटच्या सत्रात लाल रंगात बंद झाले. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, आजच्या घसरणीत गुंतवणूकदारांना सुमारे 8 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

भारतीय शेअर बाजाराने हाँगकाँगला मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाचा शेअर बाजार बनल्यानंतर बाजारात ही मोठी विक्री झाली. या काळात शेअर बाजारातील मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक सुमारे 3 टक्के घसरले. दलाल स्ट्रीटच्या गुंतवणूकदारांचे आजच्य व्यवहार सत्रात बाजार भांडवलात सुमारे 8 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. 20 जानेवारी 2024 रोजी, बीएसईवर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 374.41 लाख कोटी रुपये होते. मात्र आज ते 366.33 लाख कोटी रुपयांवर घसरले. याचा अर्थ आज गुंतवणूकदारांच्या भांडवलात 8.08 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Rajeev Dhawan : ‘जय श्रीराम’चा हत्यार म्हणून वापर का करायचाय? अयोध्या खटल्यातील वकिलाचा थेट सवाल

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 5 शेअर्स वाढीसह, तर 25 शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 10 शेअर्स वाढीसह आणि 40 शेअर्स घसरणीसह बंद झाले. जागतिक बाजारात मजबूती असली तरी बँका, तेल आणि वायू, एफएमसीजी आणि धातू क्षेत्रातील समभागांच्या विक्रीमुळे बाजार कोसळला. केवळ फार्मा क्षेत्रातील समभागांमध्येच खरेदी दिसून आली. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेच्या समभागांमध्ये झालेली घसरण निफ्टीच्या संपूर्ण घसरणीपैकी जवळपास निम्मी आहे.

रुपया 9 पैशांनी घसरला

आज डॉलरच्या तुलनेत रुपया 9 पैशांनी घसरला आहे. आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपया 83.11 वर उघडला आणि शेवटी डॉलरच्या तुलनेत 9 पैशांनी कमी होऊन 83.16 (तात्पुरता) वर बंद झाला आहे. आज दिवसभरात अमेरिकन चलनाच्या तुलनेत रुपयाने उच्चांक 83.06 आणि 83.17 चा नीचांक नोंदवला. गेल्या आठवड्यात शुक्रवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 83.07 वर बंद झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -