घरमुंबईठाण्याच्या शिवाजी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची अरेरावी

ठाण्याच्या शिवाजी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची अरेरावी

Subscribe

एका वृद्धेला उपचारासाठी दाखल करण्यास शिवाजी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नकार देत वृद्धेच्या नातेवाईकांसोबत अरेरावी केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी वृद्ध महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

अत्यवस्थ अवस्थेत उपचारांसाठी आलेल्या एका वृद्धेला दाखल करून घेण्यास शिवाजी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे खूप मन:स्ताप सहन करावा लागल्याची तक्रार वृद्धेच्या नातेवाईकांनी केली आहे. या वृद्धेला अस्थमाचा त्रास उद्भवला होता. त्यांची प्रकृती जास्त खालावली होती. त्यामुळे त्यांना नातेवाईक शिवाजी रुग्णालयात घेऊन गेले. मात्र रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दाखल करण्यास नकार केला. अखेर नातेवाईकांनी हुज्जत घातल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

काय आहे नेमके प्रकरण?

घोडबंदर रोडवरील पातलीपाडा परिसरात राहणाऱ्या शांताबाई साळवे यांना ७ मे रोजी रात्री दहाच्या सुमारास अस्थमाचा त्रास जाणवू लागला. ८५ वर्षांच्या या आजी कोणतीही हालचाल करीत नव्हत्या. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबियांनी त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे कळव्याच्या शिवाजी रुग्णालयात आणले. याठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आजींना रुग्णालयात दाखल करून घेण्यास स्पष्टपणे दिला. इथे अतिदक्षता विभाग नसल्याने त्यासाठी मुंबईच्या रुग्णालयात हलवा, असा सल्ला कर्मचारी देत होते. याविषयी बराचवेळ हुज्जर घातल्यानंतर अखेर कर्मचाऱ्यांनी आजींना दाखल करून घेतले. मात्र किरकोळ औषधे देण्यापलिकडे कोणतीही सुविधा दिली नाही. दुसऱ्या दिवशी रुग्णाला घेऊन जा, असेही त्यांनी सांगितले. बुधवारी साळवे कुटंबिय रुग्णालयाच्या अधिष्ठातांना भेटले आणि घडलेला प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्यांनी पुढील कारवाई करीत रुग्णाला आयसीयुमध्ये दाखल करून घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र त्याआधी काही झाले असते याला जबाबदार कोण? असा सवाल शांताबाई यांच्या कुटुंबियांनी विचारला आहे.

रुग्ण माझी आजी आहे. मी ठाणे महानगर पालिकेत सफाई कर्मचारी आहे. मी रात्री माझ्या आजीसोबत आले होते. संबंधित कर्मचाºयांना ही बाब सांगितली. तेव्हा त्यांनी तुम्ही कर्मचारी आहात तर तुम्हाला महापालिका पगार देते ना, अशी अरेरावीची भाषा केली गेली.
– अनिता साळवे (शांताबाई यांची नात), ठामपा सफाई कर्मचारी
- Advertisement -

 

रुग्णसेवा हेच आमचे ध्येय आहे. आम्ही त्यासाठीच आहोत. मात्र रात्री जो प्रकार घडला तो अत्यंत दुदैवी आहे. या गोष्टी येथे वारंवार घडत असतात. कारण येथील कर्र्मचारी माझ्या अधिपत्याखाली नाहीत. मी इथली डिन असले तरी हे कर्मचारी वैद्यकीय आरोग्य अधिकाºयांच्या अधिपत्याखाली काम करीत असतात. त्यामुळे या कर्मचाºयांना आम्ही काही बोलायला गेलो तर ते आम्हालाच अरेरावी करतात. रुग्ण सेवेत कुचराई झाली तरी आम्हालाच बोलणी खावी लागतात.
– संध्या खडसे, अधिष्ठाता, शिवाजी रुग्णालय, कळवा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -