घरमुंबईमेट्रो ३च्या स्थानकाबाबत शिवसेनेने केली 'ही' मागणी!

मेट्रो ३च्या स्थानकाबाबत शिवसेनेने केली ‘ही’ मागणी!

Subscribe

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याची मागणी केल्यानंतर आता शिवसेनेने मेट्रो-३ स्टेशनसाठी नवी मागणी केली आहे.

समृद्धी महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केल्यानंतर आता शिवसेनेने अजून एका नावाची मागणी केली आहे. मेट्रो 3 प्रकल्पातील शिवसेना भवन शेजारील मेट्रो रेल्वे स्थानकाला दादर ऐवजी ‘शिवसेना भवन’ असे नाव द्या, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यासाठी शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

म्हणून शिवसेना भवन नाव देण्याची मागणी

मेट्रो ३ प्रकल्पातील इतर रेल्वे स्थानकांना सिद्धिविनायक, शितला देवी, सायन्स म्यूझियम अशी त्या ठिकाणच्या ओळखी नुसार नावे देण्यात आली आहेत. त्याचमुळे शिवसेना भवन येथील मेट्रोच्या स्थानकाला शिवसेना भवन नाव द्यावे, अशी मागणी सेनेकडून करण्यात आली आहे. प्रवाशांचा गोंधळ होऊ नये म्हणून मेट्रो ३ प्रकल्पातील ‘दादर’ रेल्वे स्थानकाला ‘शिवसेना भवन’ नाव देण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे.

- Advertisement -

युतीसाठी समृद्धीला बाळासाहेबांचं नाव?

दरम्यान, समृद्धी महामार्गाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी शिवसेनेकडून याआधी करण्यात आली होती. याच महामार्गाला अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत युती करण्यासाठी समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव देण्याचं बार्गेनिंग भाजपकडून केलं जाण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -