घरमुंबईदिवाळीच्या निमित्ताने संस्थांची रक्तदानासाठी लगबग

दिवाळीच्या निमित्ताने संस्थांची रक्तदानासाठी लगबग

Subscribe

सुट्यांच्या काळात होणारा रक्ततुटवडा लक्षात घेऊन पवईतील मोरारजी क्रिकेट क्लबच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

दिवाळी आता काही दिवसांवर आहे. दिवाळीनिमित्त महाविद्यालयांना सुट्टी देखील जाहीर झाली. दिवाळी सुट्टीनिमित्ताने मुंबईबाहेर जाणाऱ्यांची संख्याही अधिक असते. त्यामुळे, या कालावधीत मुंबईत रक्तांचा तुटवडा जाणवतो. सरकारी हॉस्पिटलकडून होणाऱ्या रक्तदानाच्या अहवालानुसार आता सामाजिक संघटना आणि क्लब रक्तदान शिबिरासाठी पुढे सरसावले आहेत. सुट्यांच्या काळात होणारा रक्ततुटवडा लक्षात घेऊन पवईतील मोरारजी क्रिकेट क्लबच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून यातून एकूण ३२१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यातील २२१ युनिट निकषावर उतरले.

पवईत मोरारजी क्रिकेट क्लबच्या वतीने रक्तदान शिबिरासाठी तयारी करण्यात आली होती. अशावेळी तरुणांचा उत्स्फुर्त प्रतिसाद होता. या क्लबचे हे रक्तदान शिबिराचे सहावे वर्ष असून दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात रक्तदान शिबिर भरवून दान केलेले रक्त सरकारी हॉस्पिटलमध्ये पुरवण्यात येत असल्याचे क्लबचे मंगेश राजपुत यांनी सांगितले. यावर्षी मात्र सार्वत्रिक निवडणुकीची घोषणाही याच दरम्यान करण्यात आली. तरीही दरवर्षीचे रक्तदान शिबिरं नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच घेण्यात आली.

- Advertisement -

‘रक्तदानाच्या इतिहासात पवईचे नाव करुया’

हॉस्पिटलमध्ये रक्ताची गरज पाहता शिबिराचे आयोजन करण्यात येते. यावेळी ‘रक्तदानाच्या इतिहासात पवईचे नाव करुया’ अशी थीम ठेवण्यात आली होती. थॅलेसेमिया रुग्ण, गरोदर महिला, अपघात तसेच महत्वाच्या शस्त्रक्रिया करताना रक्ताची गरज लागते. अशावेळी रक्तदात्यांना संपर्क केला जातो. पण, सरकारी हॉस्पिटलच्या रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा मुबलक पुरवठा असल्यास त्याचा तुटवडा भासणार नाही असे मत राजेश भालेराव यांनी व्यक्त केले. दरवर्षी रक्तदान हे सामाजिक जाणिवेतून करत असल्याचे सुरज काटे यांनी सांगितले. जमा केलेल्या रक्त युनिटचे परीक्षण सरकारी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी करुन त्याला मान्यता दिली.

हॉस्पिटलमध्ये एवढ्या रक्ताची निकड 

चार प्रमुख हॉस्पिटल, १९ उपनगरीय दवाखाने आणि अन्य हॉस्पिटलमधून मुंबई शहरासाठी प्रतिवर्षी अंदाजे तीन लाख रक्त युनिटची मागणी असते. सरकारी निमसरकारी हॉस्पिटलमध्ये २०० ते २५० रक्ताच्या पिशव्या तत्पर ठेवाव्या लागतात. जननी सुरक्षा योजना, राजीव गांधी योजना, थॅलेसेमिया, अॅनेमिया सारख्या रुग्णांना रक्तपुरवठा करण्याचे सरकारचे आदेश आहेत. अशा रुग्णांना रक्तपुरवठा करताना इतर गरजू रुग्णांसाठी मात्र रक्ताची तजवीज करण्यासाठी सरकारी रक्तपेढ्यांना वेळी अवेळी रक्तदान शिबिरे भरवावी लागतात. तर रक्ताच्या तुटवड्यामुळे हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या बहुतांश सर्व शस्त्रक्रिया, प्रसुतीच्या वेळी, थॅलेसेमियाचे रुग्ण, अॅनेमियाचे रुग्ण, यांना रक्ताची नितांत गरज असते. पण, कित्येकवेळा अत्यंत गरजू रुग्णांना खासगी रक्तपेढीतून रक्त आणण्याचे सुचवण्यात येते. खासगी रक्तपेढीतील एक रक्त पिशवी ८०० ते २५०० रुपयांपर्यंत खरेदी करावी लागते. रक्त उपलब्ध झाल्याने अनेकदा लोकांना जीव ही गमवावा लागतो.


आता कुठल्याही ‘आरटीओ’मधून वाहन परवाना काढा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -