घरमुंबईप्रियंका चतुर्वेदी नंतर आणखी एका काँग्रेसच्या चतुर्वेदीचा शिवसेनेत प्रवेश

प्रियंका चतुर्वेदी नंतर आणखी एका काँग्रेसच्या चतुर्वेदीचा शिवसेनेत प्रवेश

Subscribe

काँग्रेस – राष्ट्रवादीमधून होणारे नेत्याचे आऊटगोईंग काही केल्या थांबायला तयार नाही. लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकांची चाहुल लागली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसची गळती सुरुच आहे. विदर्भातील काँग्रेसचे मातब्बर नेते समजले जाणारे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत चतुर्वेदी हे आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेने पक्षात घेतल्यानंतर आता काँग्रेसचेही नेते शिवसेनेच्या वाटेवर आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी दुपारी ४ वाजता मातोश्री येथे दुष्यंत चतुर्वेदी हे हाती शिवबंधन बांधून घेतील. सतीश चतुर्वेदी हे विदर्भातील काँग्रेसचे मोठे नेते मानले जाच होते. मात्र पक्षविरोधी काम केल्यामुळे काही काळापूर्वी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. सतीश चतुर्वेदी हे २५ वर्ष आमदार तर १० वर्ष कॅबिनेट मंत्री होते. विदर्भात त्यांचा चांगला जनसंपर्क असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या या जनसंपर्काचा फायदा दुष्यंत यांना होऊ शकतो.

- Advertisement -

उच्चशिक्षित असलेले दुष्यंत कुमार शिवसेनेपासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करतील. याआधी ते सामाजिक कार्यात सक्रीय होते. विदर्भ माथाडी कामगार सेनेचे ते कार्यकारी अध्यक्ष आहेत. तर नागपूर मधील लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेचे ते विश्वस्त आणि संचालक आहेत. मुंबई आणि नागपूर येथे संस्थेच्या २८ शाखा आहेत. २००० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि २० हजारहून अधिक विद्यार्थी संस्थेत शिक्षण घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -