घरमुंबईमुख्यमंत्र्यांचे ओएसडी सुधीर नाईक यांना मातृशोक

मुख्यमंत्र्यांचे ओएसडी सुधीर नाईक यांना मातृशोक

Subscribe

मुंबई महापालिकेचे निवृत्त सह आयुक्त सुधीर नाईक यांच्या मातोश्री सुजाता शामराव नाईक यांचे दीर्घ आजाराने प्रभादेवीच्या राहत्या घरी गुरुवारी सायंकाळी ४.३०च्या सुमारास निधन झाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष कार्य अधिकारी आणि मुंबई महापालिकेचे निवृत्त सह आयुक्त सुधीर नाईक यांच्या मातोश्री सुजाता शामराव नाईक यांचे दीर्घ आजाराने प्रभादेवीच्या राहत्या घरी गुरुवारी सायंकाळी ४.३०च्या सुमारास निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात सुधीर आणि वासुदेव हे दोन मुलगे सुना आणि अपर्णा, शुभांगी या दोन मुली, जावई तसेच नातवंडे असा परिवार आहे.

प्रभादेवी महापालिका शाळेच्या निवृत्त शिक्षिका

सुजाता नाईक या महापालिका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर प्रभादेवी महापालिका शाळेतून शिक्षिका म्हणून त्या निवृत्त झाल्या होत्या. मागील अनेक वर्षांपासून त्या आजारी होत्या. अखेर गुरुवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर दादर शिवाजी पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीत गुरुवारी रात्री १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. नाईक कुटुंबिय सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा येथील असून सुजाता यांचे माहेर मालवणच्या चिंदर येथील आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सुधीर नाईक यांच्या मित्रपरिवाराने मुंबईतील प्रभादेवी येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन पार्थिवाचे अंतिम दर्शन घेत नाईक कुटुंबियांचे सांत्वन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -