घरमुंबईचोरट्यांवर तंत्रज्ञानाची पारख; मुंबई सेंट्रल येथे पहिले सायबर सेल

चोरट्यांवर तंत्रज्ञानाची पारख; मुंबई सेंट्रल येथे पहिले सायबर सेल

Subscribe

मागील काही वर्षापासून तांत्रिक वस्तू चोरी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. यांस प्रतिबंध घालण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या रेल्वे सुरक्षा दलाने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला.

मुंबई सारख्या स्वप्नाच्या नगरीत प्रवास करणं हे अधिक जोखीमीचे झाले आहे. लोकलने प्रवास करतांना रोज चोरीच्या घटना घडताना दिसतात. मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या तांत्रिक आणि मौल्यवान वस्तू भूरटे चोर सहज लंपास करत असतात. याच चोरांचा मागोवा घेण्यासाठी तसेच त्या शोधण्यासाठी भारतीय रेल्वेने सायबर सेल उभारण्याचा निर्णय घेतला असून पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल स्थानक येथे पहिले सायबर सेल असेल.

अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणार

मागील काही वर्षापासून तांत्रिक वस्तू चोरी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. यांस प्रतिबंध घालण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या रेल्वे सुरक्षा दलाने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला. या सेलद्वारे चोरी झालेले आणि हरविलेले मोबाईल्सच्या जीपीएस, लोकेशनद्वारे मोबाईल फोनचा शोध घेणे सोयीचे ठरणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाना मान्यता मिळण्याची प्रक्रिया सुरू असून जवानांची फौज याकरता काम करणार आहे.

- Advertisement -

प्रवाशांचा प्रवास सुरक्षित 

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथे उपनगरीय लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्याही थांबतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात सामान तसेच प्रवाशांची चढ-उतार केली जाते. अशावेळी मौल्यवान वस्तू आणि तांत्रिक वस्तू चोरीला गेल्याने ते पुन्हा मिळवणे या सायबर सेलमुळे शक्य होणार आहे. सायबर सेल सुरू केल्याने प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येणार आहे. चोरीच्या घटनांत होणारी वाढ थांबवण्यासाठी आरपीएफच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -