घरमुंबईपावसाळ्यासाठी ठाण्यातील महापालिका प्रशासन सज्ज

पावसाळ्यासाठी ठाण्यातील महापालिका प्रशासन सज्ज

Subscribe

लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितामुळे आता हाती नेहमीपेक्षा खूपच कमी वेळ असला तरी पावसाळ्यासाठी ठाणे महापालिका सज्ज झाली आहे.

लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितामुळे आता हाती नेहमीपेक्षा खूपच कमी वेळ असला तरी पावसाळ्यासाठी ठाणे महापालिका सज्ज झाली आहे. पावसाळ्यामध्ये आपत्ती निर्माण झाल्यास समन्वयाने काम करण्याच्या सूचना आयुक्तांनी मंगळवारी आढावा बैठकीत दिल्या. तसेच १५ मेनंतर खोदकाम केल्यास संबंधितांविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे येत्या ३१ मे पर्यंत नालेसफाई नालेसफाई आणि रस्त्याच्या दुरूस्तीची कामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत.

शहरातील नागरी संशोधन केंद्रात ठाण्यातील सर्व शासकीय संस्थांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महापालिका अधिकाºयांसोबत वाहतूक पोलीस कार्यालय, आरटीओ, महावितरण, एमटीएनएल, महानगर गॅस आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शहरातील प्रभागनिहाय अनधिकृत बांधकामांची पाहणी करणे, त्याचबरोबर धोकादायक इमारतींची यादी तयार करुन त्या इमारतीत राहणाºया नागरिकांना इतरत्र स्थलांतरीत करुन सी-१ आणि सी-२ इमारती खाली करण्याचे तसेच ज्या भागात दरड कोसळयाचा संभव आहे, अशा ठिकाणी राहणाºया नागरिकांनाही स्थलांतरीत करण्याचे आदेश त्यांनी दिले.

- Advertisement -

पावसाळ्यात एखाद्याा विभागातील वीज पुरवठा खंडीत झाल्यास पर्यायी व्यवस्था निर्माण करावी. ज्या चेंबरवर झाकणे नाहीत, त्यांच्यावर त्वरित झाकणे लावावीत, घनकचरा विभागाने प्रत्येक प्रभागात एकेक जेसीबी आणि पोकलेन यंत्र उपलब्ध करून द्याावे. कोणतीही आपत्ती उद््भवल्यास कमीत कमी वेळेत मदत पथक घटनास्थळी पोहचावे. यासाठी मनुष्यबळ आणि यंत्रणा विकेंद्रीत करुन ती विविध ठिकाणी नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच उद्याान विभागाने वृक्षफांद्याा छाटणीबाबत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देतानाच छाटलेल्या फांद्या त्वरीत उचलण्याची कार्यवाही करावी असे सांगण्यात आले. आपत्कालिन कक्ष आणि अग्निशमन दलास विशेष काळजी करण्याचे निर्देश देण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -