घरमुंबईहार्बर लाईनवर सर्वात जास्त बळी

हार्बर लाईनवर सर्वात जास्त बळी

Subscribe

बरेच मुंबईकर नोकरीनिमित्त घराबाहेर पडतात. हे सर्व प्रवासी मोठ्या प्रमाणात लोकल ट्रेनने प्रवास करतात. त्यामुळे मुंबईच्या रेल्वेगाड्यांमध्ये बरीच गर्दी होते. अशावेळी अनेक प्रवासी दरवाज्यावर लटकत प्रवास करतात. अशावेळी ओव्हरहेड वायर लागून प्रवासी जखमी होतात तर काही प्रवाशांचा मृत्यू देखील होतो. यामध्ये ओव्हरहेड वायर लागल्याने हार्बर लाईनवर सर्वात जास्त बळी झाल्याचे समोर आले आहे.

लोकल ट्रेन म्हणजे मुंबईची लाइफ लाइन. दररोज ८० लाखापेक्षा जास्त प्रवासी उपनगरीय रेल्वे गाड्यातून प्रवास करतात. मुंबईच्या रेल्वेगाड्यांमध्ये बरीच गर्दी असते, या गर्दीमुळे प्रवासी स्वत:चा जीव धोक्यात घालून रेल्वेच्या दारावर लटकून उभे राहून प्रवास करतात. तसेच काही प्रवासी ट्रेनच्या छतावरुन प्रवास करतात. तर काही तरुण मुले स्टनबाजी देखील करतात. यामुळे दररोज सरासरी १० ते १२ प्रवासी रेल्वे गाड्यातून पडून किंवा शॉक लागून मरतात. तसेच गेल्या पाच वर्षांत शॉक लागून १४३ प्रवाश्यांना आपले जीव गमावावे लागल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना रेल्वे पोलीस विभागांनी दिली आहे.

ओव्हरहेड वायरने १४३ प्रवाशांचा मृत्यू

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी रेल्वे पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयात रेल्वेच्या ओव्हरहेड वायर पासून शॉक लागून किती प्रवाशांचा मृत्यू किंवा जखमी झाले आहे, याबाबत माहिती मागितली होती. या माहितीप्रमाणे सन २०१३ पासून मे २०१८ पर्यंत ओव्हरहेड वायर पासून शॉक लागून एकूण १४३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून एकूण १३८ प्रवासी जखमी झाले आहे.

- Advertisement -

या स्थानकांवर प्रवाशांचे झाले मृत्यू

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कर्जत स्थानकांनादरम्यान एकूण ६७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आता पर्यंत एकूण ५२ प्रवासी जखमी देखील झाले आहेत. तसेच पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते पालघर स्थानकांदरम्यान एकूण ४० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आणि एकूण ३१ प्रवासी जखमी झाले. तसेच हार्बर रेल्वेच्या सॅंडहर्स्ट रोड ते पनवेल स्थानकांदरम्यान एकूण ३६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर 39 प्रवासी जखमी झाले आहेत. सर्वात जास्त ओव्हर वायरचा शॉक लागून प्रवाशांचा मृत्यू चेंबूर आणि टिळक नगर स्थानकांदरम्यान झाला आहे. चेंबूर स्थानकावर एकूण ११ प्रवाशांचा मृत्यू आणि ६ प्रवासी जखमी झाले आहे. तसेच टिळक नगर स्थानकावर एकूण ५ प्रवाशांचा मृत्यू आणि १४ प्रवासी जखमी झाले आहे.
तसेच मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये २०१७ साली रेल्वेगाड्यातून पडून ३०१४ प्रवासी मृत्यू पावले तर ३३४५ प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच मध्य रेल्वेगाड्यातून पडून १५३४ प्रवासी मृत्यू पावले तर १४३५ प्रवासी जखमी झाले आहे. पश्चिम रेल्वेगाड्यातून पडून १०८६ प्रवासी मृत्यू पावले असून १५४० प्रवासी जखमी झाले आहे. तसेच हार्बर उपनगरीय रेल्वेगाड्यातून पडून ३९४ प्रवासी मृत्यू पावले आहेत तर ३७० प्रवासी जखमी झाले आहे. तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवर रेल्वेगाड्यातून पडून जखमीं किंवा मृत प्रवाश्यांना उचलण्यासाठी कोणतेही विशेष कर्मचारी नियुक्त केले गेले नाहीत. अशा अपघातानंतर संबंधित स्टेशन मास्तर स्थानिक हमाल आणि स्वयंसेवी सेवकांची मदत घेतात.

ही आहेत मृत्यूची कारणे

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्बर लाईनवर ओव्हर रेल्वेहेड वायरचा शॉक लागून सर्वात जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे हार्बर लाईनवर ट्रेनच्या फेऱ्या कमी आहेत. तसेच दुसरे कारण आहे ते म्हणजे गोवंडी आणि चेंबूर क्षेत्रात राहणारी तरुण मुले ट्रेनच्या छतावर स्टनबाजी करताना आपले जीव गमावतात. गोवंडी आणि चेंबूर क्षेत्रात राहणाऱ्या रहिवासी यांनी आप-आपल्या मुलांना ताकीद देण्याची गरज आहे कि, ट्रेनच्या छतावरुन प्रवास करू नये. तसेच शकील अहमद शेख यांनी मुंबईकरांना अपील केले आहे कि, आपण सुरक्षित प्रवास करावा, आपल्या मागे आपले कुटुंब आहे. त्यांची काळजी करावी. यासंदर्भात शकील अहमद शेख यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि रेल्वे बोर्ड चेअरमन अश्वनी लोहानी यांना पत्र पाठवून हार्बर लाईनवर गाड्याच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -