घरदेश-विदेशभारत- पाक सीमेवर मंगळवारी घुमणार 'शिवरायांचा' जयघोष; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण

भारत- पाक सीमेवर मंगळवारी घुमणार ‘शिवरायांचा’ जयघोष; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण

Subscribe

'आम्ही पुणेकर' या संस्थेच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काश्मीरमधील कुपवाडा येथे बसविण्यासाठी येणार आहे.

मुंबई : काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेजवळच्या 41 राष्ट्रीय रायफल (मराठा एलआय) येथे बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण मंगळवारी (7 नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी एकनाथ शिंदे जवानांसोबत दिवाळी फराळाचा आनंदही घेणार आहेत. (The shout of Shivaraya will ring on India-Pakistan border on Tuesday The unveiling of the statue by the Chief Minister)

‘आम्ही पुणेकर’ या संस्थेच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काश्मीरमधील कुपवाडा येथे बसविण्यासाठी येणार आहे. 20 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबईतील राजभवन येथील समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारुढ पुतळ्याचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले होते. तेथून राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवा झेंडा दाखवून कुपवाडाकडे हा पुतळा मार्गस्थ करण्यात आला होता.

- Advertisement -

हेही वाचा : श्रीलंका संघाचं नशीबच फुटकं; ‘तो’ मैदानावर दोन मिनिटं उशिराने पोहचला अन् बाद झाला

2200 किलो मीटरचा केला प्रवास

महाराष्ट्रातून सुरू झालेला हा प्रवास सुमारे 2 हजार 200 किमी अंतर पार करीत एका आठवड्यात कुपवाडा येथे पोहोचला. रस्त्यातील महत्वाच्या शहरांमधील ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी या पुतळ्याचे पूजन करतानाच स्वागतही करण्यात आले. मंगळावारी सकाळी दहाच्या सुमारास या पुतळ्याचे लोकार्पण एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून यावेळी जम्मू -काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : ओबीसींना लक्ष्य करणारा बीडमधील ‘तो’ हल्ला पूर्वनियोजित, छगन भुजबळांचा दावा

हे आहेत पुतळ्याचे वैशिष्ट्य

कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचे भूमिपूजन यंदाच्या पाडव्याच्या दिवशीच करण्यात आले. त्यासाठी शिवनेरी, तोरणा, राजगड, प्रतापगड आणि रायगड या पाच किल्ल्यांवरील माती आणि पाणी आणण्यात आली होती. हा पुतळा साडेदहा फूट उंचीचा असून जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि 7 बाय 3 या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात येणार आहे. याठिकाणी पुतळ्याच्या मागे उंच भगवा ध्वज लावण्यात आला आहे. पुतळ्याच्या समोरच्या दिशेने असलेल्या पर्वंतरांगांच्या पलिकडे पाकिस्तान आहे. अश्वारूढ पुतळ्यावरील शिवाजी महाराजांचे मुख आणि तलवार पाकिस्तानच्या दिशेने असावे अशापद्धतीने पुतळा बसविण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे 1 हजार 800 ट्रक माती टाकून भराव करण्यात आला. शिवाय याभागातील हवामान, भूस्खलन याबाबी पाहता पक्के बांधकाम करून पाया तयार करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -