घरमुंबईधर्माच्या नावे देशाला गुलाम बनवण्याचे काम

धर्माच्या नावे देशाला गुलाम बनवण्याचे काम

Subscribe

उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

आजकाल गुरू विसरणारे, गुरू चोरणारे, वडील चोरणारे लोक आपल्याकडे आहेत, परंतु गुरू आणि वडिलांनी दिलेले संस्कार कुणालाही चोरता येणार नाहीत. हे संस्कार घेऊनच आम्ही पुढे जात आहोत. देशात धर्माच्या नावाने राजकारण करून देशाला गुलाम बनविण्याचे काम सध्या सुरू आहे, असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे नाव न घेता टीका केली.

गुरुवारी भाईंदरमध्ये भगवान विमलनाथ जैन मंदिराचा जीर्णोद्धार व अंजन शलाका प्रतिष्ठा महोत्सवानिमित्त जैन मुनी आचार्य भगवंत यशोवर्म सुरीश्वरजी महाराज आणि उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी गोहत्या कायदा फक्त महाराष्ट्रात आणि शेजारील राज्यात गो खा असेच प्रकार सुरू आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात गोहत्याबंदी कायदा आणि समान नागरी कायदा हवा, अशी मागणीही त्यांनी केली.

- Advertisement -

एकीकडे वंदे मातरम म्हणायचे आणि नंतर त्याच मातेला धर्माच्या नावावर गुलाम करायचे अशा वाढत चाललेल्या वृत्तीपासून सावध राहण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. गेल्या २५ वर्षांपासून आमच्या सोबत चालणार्‍या लोकांचे उद्दिष्ट बदलून गेले आहे. हे बदललेले उद्दिष्ट हिंदुत्वाला शोभणारे नसल्यामुळे आम्ही त्यांची साथ सोडली, असे म्हणत त्यांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली, तर राज्यातील घडामोडींवर मत वक्तव्य करताना डोक्यावर संकट आले म्हणून मी खचून जाणार नाही. उलट संकटात संधी शोधणारा मी माणूस आहे. त्यामुळे आता सुरू असलेली लढाई आम्हीच जिंकणार आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -