घरमुंबई१६ जूनला उद्धव ठाकरे अयोध्येत

१६ जूनला उद्धव ठाकरे अयोध्येत

Subscribe

शिवसेना खासदारांसह उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार आहेत.

गेल्या वर्षी आयोध्येच्या मुद्यावरून संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणारी शिवसेना पुन्हा एकदा आयोध्येला जाणार आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे १६ जूनला आपल्या विजयी खासदारांसह आयोध्येत जाणार आहेत. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेत्तृत्वाखाली हा दौरा आयोजीत करण्यात आला आहे. अयोध्येतील रामलल्ला मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेणार आहेत.

- Advertisement -

शिवसेना नेते,खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. या आधी २०१८ नोव्हेंबर महिन्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब आयोध्येत भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी रामलल्लाचेही दर्शन घेतले होते. त्यावेळी शिवसेनेने राम मंदिराच्या मुदयावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. ‘पहले मंदिर फिर सरकार’ ही शिवसेनेची घोषणा त्यावेळी देशभर गाजली. आधी राम मंदिराच्या बांधणीला कधी सुरुवात करणार ते सांगा त्यानंतरच युतीची बोलणी होईल अशी भुमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. त्यावेळी शिवसेना-भाजपा यांच्यात अत्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

येत्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना- भाजपा यांच्यामध्ये समान जागांचे वाटप होणार आहे. तर मित्रपक्षांसाठी १८ जागा सोडण्यात येणार आहेत. मात्र जागा वाटपाचा हा फॉर्म्युल्यावर शिवसेना नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच शिवसेना पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा पुढे करत भाजपला कोंडी पकडणार असल्याच सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -