घरमुंबईपहिल्याच पावसात वसईतील मुख्य रस्ते बुडाले

पहिल्याच पावसात वसईतील मुख्य रस्ते बुडाले

Subscribe

नालेसफाई न झाल्याने ही पुरपरिस्थिती निर्माण झाल्याने वसई-विरार महापालिकेला धारेवर धरण्यात आले होते.

पहिल्याच पावसात वसईतील मुख्य रस्ते बुडाल्यामुळे पालिकेने केलेला नालेसफाईचा दावा खोटा ठरला असून, यंदाही वसई बुडण्याचे संकेत मिळाले आहेत. गेल्या वर्षी ८ ते १२ जुलै दरम्यान वसई तालुक्यात पुर आला होता. या पुलामध्ये ६ जण दगावले, हजारो घरे पाण्यामध्ये बुडाली होती. यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले होते. या पाच दिवसांत पिण्याचे पाणी, जीवनावश्यक वस्तू, खाद्य पदार्थांविना नागरिकांचे हाल झाले होते. विज, इंटरनेट, मोबाईल सेवा ठप्प झाली होती. घरात पाच आणि दारात सहा फूट पाणी साचल्याने तालुक्यात हाहाकार उडाला होता.

नालेसफाई न झाल्याने वसई-विरार महापालिकेला धारेवर

नालेसफाई न झाल्याने ही पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे वसई-विरार महापालिकेला धारेवर धरण्यात आले होते. वसई का बुडाली यावर उहापोह होवून, त्याची कारणे आणि त्यावर उपाय, नागरिकांच्या सुचना विचारात घेण्याची मागणी विविध पक्ष, संस्था आणि संघटनांनी केली होती.

- Advertisement -

नालासोपारातील सेंट्रल पार्क येथील मुख्य रस्ते बुडाले

त्यामुळे महापालिकेने १२ कोटी रुपये खर्चून निरी आणि आय.आय.टी. या संस्थांची नेमणूक केली होती. या संस्थांनी वसई का बुडाली आणि त्यावर उपाय सुचवणारा अहवालही सादर केला. मात्र, त्यावर ठोस उपाययोजना न करता केवळ दिखाऊ काम केल्यामुळे पहिल्याच पावसात वसईतील वसंत नगरी, एव्हरशाईन सिटी नालासोपारातील सेंट्रल पार्क येथील मुख्य रस्ते बुडाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -