घरमुंबईकार अपघातात तरुणीचा मृत्यू

कार अपघातात तरुणीचा मृत्यू

Subscribe

कसारा – मुंबई नाशिक महामार्गावर कसारा गावच्या हद्दीत सोमवारी दुपारी एकच्या सुमारास घडलेल्या कार अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला आहे, तर चार जण जखमी झाले आहेत. हे सर्व जण घाटकोपर येथील असल्याची माहिती कसारा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी दिली.

नाशिकहून मुंबईच्या दिशेने इर्टिका कार भरधाव वेगात निघाली होती. कसारा गावच्या हद्दीतील वाशाळा फाटा पासून पुढे गेल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार दुभाजकावरून नाशिक वाहिनीवर जाऊन आदळली. कारचा वेग मोठा असल्याने गाडी दोन तीन पलटी मारून शेतात उलटली. यावेळी पिकइन्फ्रा कंपनीच्या कर्मचार्‍यांनी जखमींना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यात एक तरुणी चिंताजनक गंभीर जखमी असल्याने डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवले असता तिचा रस्त्यातच मृत्यू झाला.

- Advertisement -

डॉक्टरांना जमावाची दमदाटी
अपघातात गंभीर जखमी झालेल्या या तरुणीला शासकीय वाहन उपलब्ध न झाल्याने सोबत आलेल्या काही लोकांनी कार्यरत असलेल्या डॉक्टरांना दमदाटी केली. यावेळी घाबरलेल्या डॉक्टरांनी 50-60 लोकांचा जमाव बघून पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. यावेळी पोलिसांनी कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहचून तिथल्या जमावाला हटवून परिस्थिती नियंत्रणात आणली.

माझ्या बाबतीत आज जो दमदाटीचा प्रकार घडला तो निंदनीय आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करत असताना अशा भडकावू वृत्तीच्या लोकांमुळे हल्ल्याची भीती निर्माण झाली आहे. जखमींसोबत आलेल्या चार ते पाच लोकांनी दमदाटी करून कारवाईची धमकी दिली. पोलीस वेळेत आले नसते तर गंभीर घटना घडली असती.
– डॉ. देवेंद्र वाळुंज, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, कसारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -