घरपालघरचिमुकल्याची विक्री करणारी टोळी गजाआड

चिमुकल्याची विक्री करणारी टोळी गजाआड

Subscribe

तसेच मुलाला कधीही भेटायचे असल्यास भेटू शकते, असे सांगितले. त्यानंतर महिलेने अमिनला त्यांच्या ताब्यात दिले.

वसई : एका महिलेच्या दोन महिन्यांचा मुलाचे संगोपन करण्याची बतावणी करून मुलाला विकणार्‍या टोळीतील चार जणांना मीरा- भाईंदर ,वसई -विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा तीनच्या पथकाने अटक केली आहे. विरार पूर्वेकडील समर्थ कृपा अपार्टमेंट परिसरात असलेल्या एका गरीब महिलेला २७ डिसेंबर २०२२ च्या दुपारी तीन महिला आणि चार पुरुषांनी गाठले. यावेळी त्या गरीब महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत या टोळीने तिच्या दोन महिन्यांच्या अमिन या मुलाचा सांभाळ करण्याची बतावणी केली. तसेच मुलाला कधीही भेटायचे असल्यास भेटू शकते, असे सांगितले. त्यानंतर महिलेने अमिनला त्यांच्या ताब्यात दिले.

मात्र, काही दिवसातच अमिनला विकण्यात आल्याची माहिती महिलेला मिळाल्यानंतर तिने विरार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्ष्यात घेवून वरिष्ठांनी गुन्हयातील अपहरीत मुलाचा शोध घेवून जलद गतीने गुन्हा उघडकीस आणण्याकरीता गुन्हे शाखा, कक्ष ३ विरार यांना सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने गुन्हे शाखा, कक्ष ३ विरार येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची तीन स्वतःत्र पथके तयार करण्यात आली होती.

- Advertisement -

पोलीस पथकांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदार यांच्याकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बाळकृष्णा ऊर्फ कृष्णा भिकाजी कांबळे याला पालघरजवळील सफाळे येथून अटक केली. त्यानंतर गोविंद रामजी परमार, (वय ७१ वर्षे रा. भाईंदर पूर्व) याला अटक केली. तर मुकेश प्रभुलाल दहीया (वय ४८ वर्षे, रा. जि. वलसाड, राज्य गुजरात) आणि भूषण हरखीत सिंग (वय ४६ वर्षे, रा. जि. वलसाड, राज्य गुजरात) यांना वलसाड येथून अटक केली. पोलिसांनी अपह्त मुलगा अमिन याला भूषण सिंग याच्या ताब्यातून घेऊन सुखरुपणे पालकांच्या ताब्यात दिले. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. प्रमोद बडाख, पो. उप निरी. उमेश भागवत, पो.हवा. अशोक पाटील, सचिन घेरे, शंकर शिंदे, मुकेश तटकरे, सागर बारावकर, अश्विन पाटील, पो.अं. राकेश पवार, सुमित जाधव, सर्व नेमणुक गुन्हे शाखा कक्ष ३ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -