घरपालघरBhayander News: वीस लाखाची खंडणी मागणार्‍या आरोपीला बेड्या

Bhayander News: वीस लाखाची खंडणी मागणार्‍या आरोपीला बेड्या

Subscribe

तसेच पैसे नाही दिल्यास अक्षय शिंदेचे बरी वाईट करू अशी धमकी दिली. तर सदरील अपहरण हे जुन्या पैशाच्या वादातून करण्यात आले होते.

भाईंदर :- वीस लाख रूपयांची खंडणी मागणार्‍या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. भाईंदर पूर्वेला नवघर पोलीस ठाणे हद्दीतील इंद्रलोक परिसरातील ओम शांती चौक येथे केअरिंग व फॉरवडिंगच्या लॉजीस्टिकचे ऑफिस असून त्या ठिकाणी काम करणार्‍या अक्षय शिंदे (वय ३२ वर्ष )याचे दिवसा ढवळ्या अपहरण करून त्याला सोडण्यासाठी वीस लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच पैसे नाही दिल्यास अक्षय शिंदेचे बरी वाईट करू अशी धमकी दिली. तर सदरील अपहरण हे जुन्या पैशाच्या वादातून करण्यात आले होते.

सदरील अक्षय शिंदे यांचे अपहरण करून त्याला घेऊन गेल्याने त्याठिकाणी काम करणारा कर्मचारी सागर आंग्रे यांच्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील घटनेची माहिती नवघर पोलिसांना मिळताच त्यांनी त्या आरोपीचा तांत्रिक व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेऊन ते खोपोली जिल्हा रायगड येथे गेले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार खोपोली पोलीस ठाण्याचे स्थानिक पोलीस व नवघर पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपी इमरान शहाबुद्दीन शेख (वय २९ वर्ष ) याला बेड्या ठोकत अटक केली आहे. तर सदरील गुन्ह्याचा अधिक तपास नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हसकोटी हे करत आहेत. आरोपीला अटक करून ठाणे न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -