घरपालघरBhayander News:गटार सफाई करताना आढळले अर्भक

Bhayander News:गटार सफाई करताना आढळले अर्भक

Subscribe

सदरील नवजात अर्भकाला गटारात फेकून देणार्‍या आई - वडिल व कुटुंबियांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

भाईंदर :- भाईंदर पूर्वेला फाटक रोड, आझाद नगर येथे असलेल्या सालासर कमर्शियल सोसायटीच्या आतील अंर्तगत गटारामध्ये एक पाच ते सहा महिन्यांचे अर्भक मिळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती सफाई कर्मचार्‍यांनी स्थानिक पोलिसांना देताच पोलिसांनी ते अर्भक ताब्यात घेत भाईंदर पश्चिमेच्या टेम्बा रुग्णालयात नेले आहे. सदरील नवजात अर्भकाला गटारात फेकून देणार्‍या आई – वडिल व कुटुंबियांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. यावरून माता न तू, वैरीणी ! हे शब्द लागू होत आहेत.

पुरुष जातीचे अंदाजे चार ते पाच महिन्यांचे अर्भक सोसायटीचे दैनंदिन साफसफाई करणार्‍या कर्मचार्‍यांना कचर्‍या सोबत आढळून आले. याबाबत त्यांनी स्थानिक नवघर पोलिसांना माहिती दिली त्यावरून पोलिसांनी ते अर्भक ताब्यात घेत टेम्बा रुग्णालयात प्रिझर्व्ह ( राखीव ) करून ठेवले आहे, तर हे अर्भक सालासर कमर्शियल सोसायटीच्या आत मधील गटाराच्या चेंबरमध्ये कोणी टाकले यासाठी सीसीटीव्ही फुटेज मागणी साठी पत्र दिले असून या अर्भकाबाबत नवघर पोलीस हे भादवी ३१८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या सदर तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निवास गारळे हे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -