घरपालघरजंगी सभा, होऊ दे खर्च, या वेळी व्हायचंय सरपंच

जंगी सभा, होऊ दे खर्च, या वेळी व्हायचंय सरपंच

Subscribe

या करिता गावामध्ये चकरा मारतांना दिसत आहेत.त्यामुळे गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे

वाडा : स्थानिक स्वराज्य संस्थेतील महत्वाच्या मानल्या जाणा-या ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला असून येत्या १६ तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळे गावातील राजकीय वातावरण पूर्णता ढवळून निघाले असून गावातील चौका- चौकात, चावडीवर निवडणुकीच्या चचेॅला उधाण आले आहे. ग्रामपंचायतींची निवडणूक राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढली जात नसली तरी राजकीय पक्षांचे नेते आपल्या पॅनलचा उमेदवार सरपंच पदासाठी निवडून यावा. या करिता गावामध्ये चकरा मारतांना दिसत आहेत.त्यामुळे गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तालुक्यात ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.त्यापैकी वडवली, मांडवा या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. सरपंच पदासाठी जनतेतून थेट निवडून होणार असल्याने प्रत्येक पॅनलने आपलाच उमेदवार सरपंचपदासाठी निवडून यावा यासाठी चांगलीच कंबर कसली असल्याने सरपंचपदाची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे.
थेट सरपंच निवडणुकीमुळे सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार फारसे इच्छुक नव्हते. त्यामुळे तालुक्यात २०४ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.ओद्योगिक पट्ट्यात मात्र निवडणुका चुरशीच्या होणार आहेत.५२ गाव खेड्यांची बाजारपेठ असलेल्या कुडूस ग्रामपंचायती मध्येही तिरंगी लढत होत होत असून काँग्रेसचे ज्येष्ट नेते व माजी उपसरपंच इरफान सुसे यांच्याविरुद्ध नौशाद शेख यांच्यात प्रभाग क्रमांक ५ मध्ये चुरशीचा सामना रंगणार आहे.तर प्रभाग क्रमांक ३ मध्ये जिजाऊ संघटनेचे कामगार नेते व माजी उपसरपंच डॉ.गिरीश चौधरी विरूद्ध हॉटेल व्यावसायिक लालू पोपटीया यांच्यात लढत होणार आहे.तर बिलावली ग्रामपंचायतीत भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या पॅनल विरूद्ध भाजपचे माजी तालुकाध्यक्ष केशव पाटील यांच्यात वर्चस्वासाठी सामना रंगणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -