घरपालघरDapchari News : दापचरी दुग्धप्रकल्प वसाहतीत घरफोडी ,लाखोंचा ऐवज लंपास

Dapchari News : दापचरी दुग्धप्रकल्प वसाहतीत घरफोडी ,लाखोंचा ऐवज लंपास

Subscribe

सकाळी तलासरी पोलीस घटनास्थळी दाखल होत सदर घटनेची कारवाई करीत असताना चोरट्यांनी चोरलेले दोघांचे मोबाईल घरापासून काही अंतरावर टाकलेले आढळले.

डहाणू : तलासरी येथील दापचरी दुग्ध प्रकल्पातील युनिट नंबर 92 मधील घरामध्ये मध्यरात्री तीन ते चार घरफोड्यांनी घरात शिरून घर मालकाला मारहाण करत जबरी घरफोडी केली.शनिवारी रात्री 1.45 च्या दरम्यान युनिट क्रमांक 92 मधील घरमालक शांताराम इंगळे आणि त्यांची पत्नी झोपले असताना तीन ते चार घरफोड्यांनी दरवाज्याची सेफ्टी कुलूप तोडून आतील दरवाजाची कडी कटावणीने उघडून घरात प्रवेश केला. या आवाजाने घरमालक शांताराम इंगळे व त्यांच्या पत्नी जागा झाल्या .त्यांना चोरट्यांनी पकडून मारहाण व दमबाजी करीत इंगळे यांचे हात बांधून ठेवले व त्यांच्या पत्नीच्या तोंडावर मारहाण करीत पैसे कुठे ठेवलेत अशी विचारणा केली .त्यानंतर त्यांनी लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून व शोकेसमध्ये ठेवलेले मंगळसूत्र व इतर दागिने तसेच रोख असे एकूण अडीच ते तीन लाखांचा ऐवज चोरून पळ काढला. चोरट्यांनी घरात शिरल्यावर पहिल्यांदा मारहाण करीत दोघांचे मोबाईल ताब्यात घेतले होते.

चोरटे गेल्यानंतर इंगळे यांनी शेजार्‍यांना सदर घटनेची माहिती सांगितली व तलासरी पोलिसांना याबाबतीत कळवले. सकाळी तलासरी पोलीस घटनास्थळी दाखल होत सदर घटनेची कारवाई करीत असताना चोरट्यांनी चोरलेले दोघांचे मोबाईल घरापासून काही अंतरावर टाकलेले आढळले. याबाबतीत अधिक माहिती घेत चोरटे अंदाजे 25 ते 28 च्या वयोगटातले होते असा अंदाज बांधत तपास कार्य सुरू केले आहे .या घर फोडीमुळे दापचरी युनिट परिसरात एकांतात राहत असलेल्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या दुग्ध प्रकल्प परिसरात कोणत्याही प्रकारचे लक्ष पुरवले जात नसल्याने अनेक समस्यांची वानवा आहेत .यामुळे सध्या येथे राहणार्‍या नागरिकांमध्ये घबराट पसरली असून सुरक्षेच्या कोणत्याही उपाय प्रकल्पाने योजलेल्या नाहीत. याबाबतीत बोलताना चोरी झालेल्या घराचे मालक इंगळे म्हणाले की मी आरडाओरडा केला असता तरी शेजारी कोणी राहत नसल्याने फायदा झाला नसता. यामुळे चोरट्याने जास्त मारहाण केली असती आणि आमच्या जीवाला धोका झाला असता.

- Advertisement -

“अशा संकटाच्या वेळी 112 क्रमांकावर कॉल करावा. जेणेकरून पोलीस विभागाकडून तात्काळ मदत पोहोचेल आणि जेणेकरून असे प्रकार टळतील ,याबाबतीत आवश्यक ती कारवाई सुरू आहे. याबाबतचे सर्व धागे दोरे गोळा करीत असून लवकरच याबाबतीत कारवाई केली जाईल.”
– बबन गावित , पोलीस उप निरीक्षक ,तलासरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -