घरपालघरमुंबई-अहमदाबाद राडारोडयाच्या भरावातील कचरा जाळून झाडांची हत्या

मुंबई-अहमदाबाद राडारोडयाच्या भरावातील कचरा जाळून झाडांची हत्या

Subscribe

भूमाफियांनी कार्यभाग साधल्याने शंभर पेक्षा अधिकच्या संख्येने असलेली झाडांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या एवढी शिल्लक राहिली आहेत.

मनोर: मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत आणि वनविभागाच्या जागेत केलेल्या राडारोडयाच्या भरावातील कचरा जाळून झाडे मारण्याचा प्रयत्न भूमाफियांकडून केला जात आहे.विशेष म्हणजे भूखंडावरील झाडे मारण्यासाठी रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साहाय्याने झाडे पाडून राडारोड्याच्या भरावाखाली दाबून टाकली जात आहेत.भूमाफियांनी कार्यभाग साधल्याने शंभर पेक्षा अधिकच्या संख्येने असलेली झाडांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या एवढी शिल्लक राहिली आहेत.झाडे कापण्यासाठी वनविभाग परवानगी देत नसल्याने झाडांच्या खोडात रसायन टाकून अवैधरित्या झाडे मारण्याचा प्रयत्न कुडे गावच्या ग्रामस्थांनी हाणून पाडला होता.झाडे मारण्यासाठी भूमाफियांनी नवीन शक्कल शोधली आहे.झाडे मारण्यासाठी झाडांच्या खोडाजवळ केलेल्या राडारोड्याच्या भरावातील कचरा एकत्र करून जाळला जात आहे.वनविभागाकडून कचरा जाळून झाडे मारणार्‍यांविरोधात कारवाई होत नसल्याने कुडे गावाच्या ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. मुंबई शहरातील बांधकाम साईटवर निर्माण होणारा कचरा आणि राडारोडा महापालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यासाठी मुंबई महापालिकेने बंदी घातल्याने वसई -विरार महापालिका क्षेत्र तसेच पालघर तालुक्यामध्ये महामार्गालगत बेकायदेशीर टाकला जात आहे.मुंबई -अहमदाबाद महामार्गावरील कुडे गावच्या हद्दीत महामार्गालगतच्या वनविभागाच्या विवादित जागेत राडारोडा आणि कचर्‍याचा भराव करण्यात आला आहे.

यात असलेला कचरा,लाकूड आणि प्लास्टिकचा वापर विवादित जागेवरील उभी झाडे मारण्यासाठी कचर्‍याचा वापर केला जात आहे.कचरा आणि प्लास्टिक झाडांच्या खोडालगत जाळला जात आहे.कचरा आणि प्लास्टिक जाळल्याने धुर आणि दुर्गंध निर्माण होत असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.झाडे मारण्यासाठी कचरा जाळण्या वरोधात ग्रामस्थांनी वनविभाग आणि स्थानिक ग्रामपंचायतीकडे केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे.पर्यावरणाच्या रक्षणासाठी कचरा जळणार्‍या भूमाफियांवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisement -

कोट

कुडे गावच्या हद्दीत वनविभागाच्या भूखंडात टाकलेला कचरा जाळून झाडे मारली जात आहेत.भूखंडावरील झाडे रात्रीच्या वेळी तोडून कचर्‍याखाली जेसीबी मशीनच्या साहाय्याने झाडांची विल्हेवाट लावल्याने झाडांची संख्या घटली आहे.झाडांच्या रक्षणासाठी वनविभागाचे कर्मचारी दुर्लक्ष करून भूमाफियांना मदत करीत आहेत.
पाटील,अध्यक्ष, संयुक्त वनव्यवस्थापन समिती, कुडे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -