घरपालघररुग्णालयाला जागा अल्प,विकासकाच्या डोक्यात मोठा प्रकल्प

रुग्णालयाला जागा अल्प,विकासकाच्या डोक्यात मोठा प्रकल्प

Subscribe

महापालिका मुख्यालयासह नवीन रुग्णालय विकासक उभारणार असल्याने त्याच्याकडून अपुरी जागा प्रशासनाला प्राप्त होणार असल्याचा आरोपही भूमिपूजनापूर्वीच भाजपच्या माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी केला आहे.

भाईंदरः मीरा रोड येथील कनकिया परिसरात आरक्षण ३०२ च्या जमिनीवर रुग्णालयाची इमारत उभारण्याचे काम एका विकासकामार्फत केले जाणार आहे. परिणामी, विकासकाला अधिक आणि महापालिका रुग्णालयासाठी अल्प जागा उपलब्ध होणार आहे. ही जागा रुग्णांवर उपचार करण्यासाठीही कमी पडेल, असा आरोप करत भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी या कार्यक्रमाला जाणार नाही, असेही जाहिर करून धक्का दिला आहे. मीरा भाईंदर महापालिकेच्या नव्या मुख्यालय इमारतीसह रुग्णालयाच्या बांधकामाचे भूमीपूजन मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्याआधीच माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी याकामांवर आक्षेप घेत कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही असेही सांगून आपला विरोध जाहिर केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. मिरा-भाईंदर महापालिकेच्या नवीन मुख्यालय इमारतीचे काम तांत्रिक अडचणीत सापडणार असून ते प्रत्यक्षात साकारणे अशक्य होणार आहे. महापालिका मुख्यालयासह नवीन रुग्णालय विकासक उभारणार असल्याने त्याच्याकडून अपुरी जागा प्रशासनाला प्राप्त होणार असल्याचा आरोपही भूमिपूजनापूर्वीच भाजपच्या माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी केला आहे.

मिरा-भाईंदर महापालिकेची सध्या अस्तित्वात असलेली मुख्यालयाची इमारत अपुरी पडू लागल्याने नवीन मुख्यालय घोडबंदर येथे उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. मात्र मुख्यालयाची जागा ही उद्यान आरक्षण, सुविधा भूखंड व अन्य खासगी जमिनीत मोडत असल्याचे सांगत ती तांत्रिक अडचणीत अडकण्याची शक्यता आहे, असे मेहता यांचे म्हणणे आहे. कनकिया परिसरात मुख्यालयासाठी राखीव जागा असताना घोडबंदरला एका कोपर्‍यात ते उभारण्याचा घाट का? असा सवालही उपस्थित केला आहे. महाराणा प्रताप यांच्या स्मारकाचे उद्घाटन २०२० मध्ये झाले असतानाही आता पुन्हा मुख्यमंत्र्यांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तीकडून त्याचे उद्घाटन कशाला ?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

आयुक्तांचे स्पष्टीकरण

दरम्यान, मेहता यांच्या आरोपावर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी खुलासा करत मिरा-भाईंदर महापालिका मुख्यालय व रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेताना नव्या विकास नियमानुसार कार्यवाही करण्यात आली आहे. त्यासाठी पुरेपूर अभ्यास करूनच प्रशासनाने निर्णय घेतला आहे. म्हणून आगामी काळात कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवणार नाहीत. या सर्व बाबी लक्षात घेऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे ढोले यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -