घरपालघरMicrosoft News: मुक्काम पोस्ट डहाणू मेघापाडा ते मायक्रोसॉप्टचा वैज्ञानिक

Microsoft News: मुक्काम पोस्ट डहाणू मेघापाडा ते मायक्रोसॉप्टचा वैज्ञानिक

Subscribe

नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी त्याला राष्ट्रपती भवनात बोलावून सन्मानित केले आहे. त्याच्या या यशाची कीर्ती पाहून आता सर्वच घरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे .

डहाणू , महेश भोये: पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यामधील बांधघर मेघापाडा येथील रहिवासी महेश सुरेश गोरात या आदिवासी युवकाची जगातील सर्वात श्रीमंत वर्गामध्ये मोडणारे आणि महान व्यक्तिमत्व असलेले बिल गेट्स यांच्या अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये सीनिअर वैज्ञानिक या उच्च पदावर नेमणूक झाली आहे. दुर्गम भाग आणि आदिवासी पाड्यावर राहणार्‍या या तरुणाने कमी वयात घेतलेला गगनभरारीमुळे पालघर जिल्हा सह इतर जिल्ह्यात महेशवर अभिनंदन करत वर्षाव केला जात आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी त्याला राष्ट्रपती भवनात बोलावून सन्मानित केले आहे. त्याच्या या यशाची कीर्ती पाहून आता सर्वच घरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे .

महेश सुरेश गोरात हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत यशस्वी होऊन त्याने समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे . त्याच्या कुटुंबात आई बाबा , दोन मोठ्या बहिणी , दोन भाऊ तसेच पंजोबा , आजोबा असे कुटुंब आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळा बांधघर पाटिलपाडा येथे झाले असून माध्यमिक शिक्षण पूज्य आचार्य भिसे हायस्कूल कासा येथे झाले. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण एम के ज्युनिअर कॉलेज चिंचणी येथे झाले व त्याच महाविद्यालयात त्याने बि. एस. सी.आय टी शिक्षणाची पदविका प्राप्त केली. शिक्षणाबद्दलची तळमळ व गणित विषयातील आवड बघून त्याला कॉलेजच्या प्राचार्य प्राध्यापक प्राध्यापिका यांनी पुढील शिक्षण आयटी क्षेत्रात घेण्यासाठी मदत केली. प्रेरणादायी बाब म्हणजे त्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्याच्या वडिलांनी स्वतःची किडनी विकण्याचा देखील तयारी दाखवली होती दरम्यान गुरुजी आणि वडिलांचा हा विश्वास त्यांनी सार्थ ठरवत बीएससी आयटीत 97 टक्के गुण मिळवले. घरची मुळात परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने महेश हा सुट्टीत घरी आल्यावर घरातच राहून अभ्यास करत असे. आई- बाबा हे तुटपुंजी असलेली शेती करत इतर वेळी बाहेर गावी जाऊन मुलांच्या शिक्षणाकरीता काम करत पैसे पुरवत असत. महेशने उच्च शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन्स कॉलेजला पूर्ण केले. तिथे सुद्धा शिक्षणात पहिल्या दहामध्ये येण्याचा मान मिळवला.

- Advertisement -

अशी झाली निवड

महाविद्यालयात प्रकल्प सार्थ करण्यास दिले जातात. त्यात महेशने मेसेजिंग एप्लिकेशन्स हा प्रोजेक्ट यशस्वी केला.त्यानंतर कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू होणार्‍या कंपनीतर्फे मायक्रोसॉफ्ट या कंपनीमध्ये निवड होताच या कंपनी द्वारे त्याला अजून दोन सॉफ्टवेअर संदर्भात प्रोजेक्ट वर्क दिले गेले. त्यातही त्याने यश संपादन केले. त्यानंतर त्याच कंपनीमध्ये त्याची सीनिअर वैज्ञानिक म्हणून पदी नियुक्ती करण्यात आली आहे.जिद्द आणि चिकाटी असली की कोणत्याही परिस्थितीवर मात करून यश मिळते हे महेशने साध्य करून दाखविले आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी शिक्षक संघटनेने त्याच्या यशाचे कौतुक अभिनंदन करत त्याला पुढील वाटचालीसाठी खूप सार्‍या शुभेच्छा दिल्या. यावेळी यशवंत गावित , दिनेश चौधरी , सुरेश गावित आणि इतर शिक्षक वृंद उपस्थित होते.

- Advertisement -

प्रतिक्रिया

“माझ्या या यशाबद्दल सर्वांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो. परंतु ज्याप्रमाणे मी गरीब आणि गाव खेड्यातील जिल्हा परिषद शाळा येथून प्राथमिक शिक्षण ते उच्च शिक्षण घेऊन हे यश संपादन केले आहे. तर माझ्या सारखे अनेक आदिवासी गोर- गरीब विद्यार्थी यांनी यश संपादन करावे. त्यासाठी आपल्यातील कला कौशल्य ओळखावे नुसते शिक्षण घेत सरकारी नोकरी लागेल असे मनात न ठेवता औद्योगिक व तंत्रज्ञान शिक्षण घेतले पाहिजे. – महेश गोरात, वरिष्ठ वैज्ञानिक, मायक्रोसॉफ्ट कंपनी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -