घरपालघरतारपावादक भिकल्या धिंडा जिल्हा परिषदेचे ब्रँड अॅम्बेसेडर

तारपावादक भिकल्या धिंडा जिल्हा परिषदेचे ब्रँड अॅम्बेसेडर

Subscribe

यासाठी मी अध्यक्ष प्रकाश निकम आणि सर्व जिल्हा परिषदेचे आभार व्यक्त करतो, अशी भावना यावेळी धिंडा यांनी व्यक्त केली.

वसईः पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वाळवंडा येथील सुप्रसिद्ध लोककार तारपा वादक भिकल्या धिंडा यांची जिल्हा परिषदेचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, उपाध्यक्ष पंकज कोरे, समाजकल्याण समिती सभापती मनीषा निमकर, कृषी व पशू संवर्धन समिती सभापती संदीप पावडे, बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती संदेश ढोणे, महिला व बालकल्याण समिती सभापती रोहिणी शेलार, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे आणि सर्व जिल्हा परिषद सदस्य, विभाग प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत भिकल्या धिंडा यांना गौरवण्यात आले.

धिंडा यांची ही तिसरी पिढी लोककला जोपासत असून त्यांना केंद्र व राज्यस्तरावर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. संगीत नाटक अकादमी गौरव अमृत पुरस्कार २०२१, सहायक जिल्हाधिकारी,एकात्मिक आदिवासी प्रकल्प जव्हार यांच्याकडून प्रमाणपत्र२०२१, महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२२, आजादी का अमृत महोत्सव पुरस्कार सन २०२३, सुधीर मुनगंटीवार सार्वजनिक सांस्कृतिक कार्य महाराष्ट्र शासन यांच्याकडून प्रमाणपत्र २०२४ अशा पुरस्कारांनी भिकल्या धिंडा यांना सन्मानित करण्यात आले असून २०२३ साली जिल्हा परिषदेमार्फत पालघर भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. माझा अनेक स्तरावर सन्मान झाला आहे. पण जिल्हा परिषदेने केलेल्या या सन्मानामुळे मला अधिक जगण्याचे बळ दिले आहे. यासाठी मी अध्यक्ष प्रकाश निकम आणि सर्व जिल्हा परिषदेचे आभार व्यक्त करतो, अशी भावना यावेळी धिंडा यांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -