दिवाळी सुरु होण्याआधी आपण घराची साफ सफाई करतो. वास्तू शास्त्रानुसार घरातील निकामी आणि खराब वस्तू घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्यामुळे घरातील अनेक टाकाऊ वस्तू आपण घराबाहेर काढतो. मात्र, यामध्ये अशा काही वस्तू आहेत ज्यांना खराब किंवा निकामी समजून कधीही घराबाहेर फेकू नये. नाहीतर देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकतात.
दिवाळीच्या साफ-सफाईदरम्यान घराबाहेर काढू नका ‘या’ गोष्टी
शंख : दिवाळीची साफ-सफाई करताना पूजेच्या सामानातील जुना शंख किंवा कवड्या सापडल्यास त्या फेकून देऊ नका. असं केल्यास देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होतील.
मोरपंख :
दिवाळीची साफ-सफाईतील करताना जुने मोरपंख फेकून देऊ नका. कारण हे श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय असतात.
जुना झाडू :
हिंदू धर्मात झाडूला देवी लक्ष्मीचेच एक रुप मानले जाते. दिवाळीची साफ-सफाईतील करताना घरातील जुना झाडू बाहेर फेकून देऊ नका.
जुनी नाणी :
दिवाळीची साफ-सफाईतील करताना घरातील जुनी नाणी बाहेर फेकू नका. नाण्यांमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे लक्ष्मीपूजन करताना त्यांची देखील पूजा करा.